Homeआंतरराष्ट्रीयसिंधी काळेगाव येथे गोदावरी तुर पिकास आंतरराष्ट्रीय पातळीवरील शास्त्रज्ञांनी दिली भेट.

सिंधी काळेगाव येथे गोदावरी तुर पिकास आंतरराष्ट्रीय पातळीवरील शास्त्रज्ञांनी दिली भेट.

एसआरटी शेतातील पिकाची पहानी.

सिंधी काळेगाव येथील एसआरटी धारक शेतकरी विष्णूपंत गिराम यांच्या शेतातील तूरीची पहानी करताना.

दिव्य मराठवाडा नेटवर्क | जालना

जालना तालुक्यातील मौजे सिंधी काळेगाव येथील प्रगतशील शेतकरी श्री विष्णूपंत गिराम यांच्या शेतावरील तुर पिकाच्या मर व वांज प्रतिबंधक गोदावरी या वानाच्या तुर पिकास आंतरराष्ट्रीय पातळीवरील शास्त्रज्ञांनी भेट देऊन या पिकाची उत्पादन क्षमता पाहून समाधान व्यक्त केले. हैदराबाद येथील आंतरराष्ट्रीय अर्ध शुष्क कटिबंधातील पीक संशोधन संस्था येथील प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर मनीष पांडे, सहयोगी शास्त्रज्ञ डॉक्टर राघवेंद्र, संशोधन अधिकारी डॉक्टर वीरेंद्र कुमार, कृषि महाविद्यालय बदनापूर येथील प्राचार्य डॉक्टर डी के पाटील, तूर पीक पैदासकार डॉक्टर गीते कृषी विज्ञान केंद्र खरपुडी येथील कीटकशास्त्रज्ञ अजय मिटकरी यांनी कृषी विज्ञान केंद्र खरपुडी यांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेल्या विष्णू गिराम यांच्या गोदावरी या वाणाच्या तुर पिकास भेट दिली,तूर हे पीक मर व वांझ रोगास बळी पडत असल्यामुळे या पिकाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येते कृषी संशोधन केंद्र बदनापूर येथून मर व वांझ प्रतिबंधक व जास्त उत्पादन देणारे गोदावरी या तुर पिकाचे वाण संशोधित झाले आहे हे वाण कमी कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रभर शेतकऱ्यांनी स्वीकारले आहे.या गोदावरी
हे वाण कशाप्रकारे शेतकऱ्यांना जास्त उत्पादन देण्यासाठी उपयुक्त होत आहे हे पाहण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधक jalna जिल्ह्यातील गोदावरी तूर पिकाची पाहणी करण्यासाठी आले होते. वेगवेगळ्या जमिनीच्या प्रतीमध्ये, जास्त पावसामध्ये सुद्धा, लवकर किंवा उशिरा पेरणी झालेली असताना सुद्धा प्रत्येक ठिकाणी गोदावरी वाण सरस ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.हे तुरीचे गोदावरी वाण गेल्या दोन वर्षापासून पेरणी करत असल्याचे विष्णू गिराम यांनी सांगितले.

एसआरटी चा बोलबाला!!

सिंधीकाळेगाव येथील शेतकरी विष्णुपंत गिराम हे गेल्या दोन वर्षांपासून विठ्ठल वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली एसआरटी पद्धतीने शेती करतात. मागील वर्षी तुर पिकातून त्यानी विक्रमी २५ क्विंटल हेक्टरी उत्पादन घेऊन जिल्हात प्रथम क्रमांक पटकावल्याने कृषी विभागाने बक्षीस दिले होते.

RELATED ARTICLES

Most Popular