
शाम गिराम | सिंधी काळेगाव
जालना तालुक्यातील सिंधीकाळेगाव येथे महात्मा ज्योतिबा फुले सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या सन २०२६ च्या नवीन कार्यकारिणीची नुकतीच निवड करण्यात आली. यामध्ये सामाजिक कार्यात सक्रिय असलेले जगन शेषराव गिराम यांची समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी सुनील खेत्रे यांची निवड करण्यात आली आहे.समितीच्या निवड प्रक्रियेदरम्यान गावातील ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, तरुण कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्या कार्यकारिणीच्या निवडीमुळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून,आगामी महात्मा ज्योतिबा फुले जयंती अधिक भव्य आणि उत्साहात साजरी करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

निवडीनंतर उपस्थितांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. सिंधीकाळेगाव मध्ये दरवर्षी पेक्षा या वर्षी फूले यांची जयंती निमीत्त युवकांत मोठा उत्साह दिसून येत आहे.
नव्या कार्यकारिणीच्या नेतृत्वाखाली सिंधीकाळेगावमध्ये यंदाचा महात्मा ज्योतीबा फुले जयंती उत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होईल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.गावकऱ्यांनी नवनियुक्त कार्यकारिणीवर विश्वास व्यक्त करत त्यांच्या कार्यकाळात समाजहिताचे विविध उपक्रम राबविले जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.






