Homeधर्म-समाजमहाराष्ट्र समाज रत्न’ पुरस्कार विजेते योगेश भैय्या जाधव यांचा संत सावता महाराजांच्या...

महाराष्ट्र समाज रत्न’ पुरस्कार विजेते योगेश भैय्या जाधव यांचा संत सावता महाराजांच्या वंशजांच्या हस्ते सत्कार.

सावता महाराज यांचे १७ वे वंशज रविकांत महाराज वसेकर यांनी केला सत्कार.


प्रतिनिधी |सिंधी काळेगाव
बदनापूर तालुक्यातील सेलंगाव येथील समाजकार्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे योगेश भैय्या जाधव यांना नुकताच आंळदी येथे ‘महाराष्ट्र समाज रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. या अभिनंदनार्थ दिनांक ४ डिसेंबर २०२५ रोजी संत शिरोमणि सावता महाराज यांचे १७ वे वंशज रविकांत महाराज वसेकर यांनी जाधव यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचा तसेच त्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार केला.

संत सावता माळी यांचे १७ वे वंशज रविकांत महाराज वसेकर यांनी योगेश भैय्या जाधव यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचा सत्कार केला.

यावेळी रविकांत महाराज यांनी जाधव यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत समाजातील वंचित, गरीब व गरजू घटकांसाठी त्यांनी राबविलेल्या उपक्रमांचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभाशीर्वाद दिले. सामाजिक क्षेत्रात युवा पिढीने पुढे येऊन कार्य करणे ही समाजासाठी सकारात्मक बाब असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या सत्कार सोहळ्यामुळे परिसरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले असून स्थानिक व सामाजिक संघटनांनीही जाधव यांचे अभिनंदन करून त्यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES

Most Popular