
प्रतिनिधी/सिन्नर
सिन्नर तालुक्यातील वडांगळी येथे महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यातील अनुयायी व भक्तगण दर्शनासाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात येत आहे.तसेच लहान मुलांचा नवसाचा जावळ व हजारोंच्या संख्येने बोकड बळी आस्थेने या ठिकाणी दिला जातो.दरवर्षी लाखोंच्या संख्येने बोकड बळी देण्यासाठी बंजारा समाज व इतर अनेक समाज आपल्या कुटुंबासह दर्शनासाठी येत आहे.सती सामत दादा हे बंजारा समाजाचे आराध्य दैवत असुन,बोकड बळी देऊन नवस व ईच्छा,आकांक्षा पूर्ण होत आहेत अशी भावना आहे.

जालना जिल्ह्यातील महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून बंजारा समाज वडांगळी येथे दर्शनासाठी दाखल होत आहेत.याठिकाणी जालना येथील पत्रकार तुकाराम राठोड यांनी सह कुटुंब आणी नातेवाईकासह सती सामत दादा यांचे मनोभावे दर्शन घेतले व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवरील नैसर्गिक संकट दुर व्हावे अशी प्रार्थना केली आहे.






