
प्रतिनिधी | जालना
जालना तालुक्यातील सिंधीकाळेगाव येथे वीजतारांच्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत शेतातील उभे असलेले मक्याचे पीक जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. शेतकरी रामेश्वर बाबूराव गिराम यांच्या गट क्र. 299 मधील दोन एकर क्षेत्रातील मक्यापैकी सुमारे अर्धा ते पाऊन एकर पीक या आगीत पूर्णपणे जळून गेले असून, त्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने सदरील नुकसानीचा पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी रामेश्वर गिराम यांनी व्यक्त केली आहे.

जालना तालूक्यातील सिंधी काळेगाव येथील शेतकरी रामेश्वर बाबूराव गिराम यांनी त्याच्या दोन एकर शेतात मकाची लागवड केली होती.चार महिन्यात मेहनत करून ऐन काढणीला आली होती.परतू बुधवारी विद्यूततार घर्षनामुळे स्पार्किंग होऊन मकाला आग लागली सदरील शेतकरी हे बाहेर गावी असल्याने बाजूच्या शेतकर्यांनी हि आग विझविण्याचा प्रयत्न केला.परतू भर उन्हात आग वेगाने पसरत असताना स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी धाव घेत मोठ्या प्रयत्नांनी आग विझवली. मात्र, तोपर्यंत अर्धा एकर मका जळून खाक झाला होता.या जळालेल्या क्षेत्रातून अंदाजे 20 क्विंटल मका उत्पादन झाले असते. सध्या बाजारात मक्याला सुमारे 1700 रुपये प्रति क्विंटल दर मिळत असल्याने शेतकऱ्याला सुमारे 34 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.या घटनेमुळे रामेश्वर गिराम यांच्यावर आर्थिक संकट कोसळले असून त्यांनी शासनाकडे तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. आधीच अवकाळी पाऊस आणि वाढत्या खर्चामुळे अडचणीत येत असताना, त्यात ही आग लागून मोठं नुकसान झालेल आहे.दरम्यान, प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी पाहणी करून पंचनामा करावा व नुकसानग्रस्त शेतकऱ्यास लवकरात लवकर आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी रामेश्वर गिराम यांनी केली आहे.
सिंधीकाळेगाव येथे शॉट सर्किटमुळे मका जळाल्याची घटना घडली आहे.सदरील घटनेचा पंचनामा करून वरीष्ठांना कळवण्यात येईल.
–नंदकिशोर कटारे – तलाठी
गेले चार महिने मेहनत करून मी खूप कष्टाने हे मक्याचे पीक उभं केलं होते.पेरणीपासून ते आजपर्यंत सतत मेहनत घेतली, पण काही क्षणांत सगळं जळून खाक झालं. आधीच अवकाळी पावसामुळे नुकसान झालं होतं, त्यात ही आग लागून संपूर्ण हंगामच संपला आहे.तार घर्षनाने लागलेल्या या आगीत मोठे नूकसान झाले. शासनाने तात्काळ पंचनामा करून मला योग्य ती नुकसान भरपाई द्यावी, हीच अपेक्षा आहे. --रामेश्वर गिराम ,शेतकरी सिंधीकाळेगाव






