HomeNewsचैतन्य हेल्थकेअर च्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त ५१ युवकांनी केले रक्तदान.

चैतन्य हेल्थकेअर च्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त ५१ युवकांनी केले रक्तदान.

चैतन्य हेल्थकेअर चा सामाजिक स्तूत्य उपक्रम

गिरीराज गिराम|जालना

जालना येथील चैतन्य हेल्थकेअर हॉस्पिटल च्या तिसऱ्या वर्धापन दिन निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन मंगळवारी करण्यात आले होते.या शिबीराचे उद्घाटन रामधनजी चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी डॉ.रोशन चव्हाण,डॉ.स्नेहल चव्हाण सह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. रोशन चव्हाण यांनी सांगितले की
रक्तदान हा एक महत्त्वाचा सामाजिक कार्य आहे ,ज्यामुळे अनेक जणांचे जीवन वाचवले जाते. रक्तदान केल्याने न फक्त रक्त मिळवणाऱ्या व्यक्तीचे जीवन वाचते, तर रक्तदान करणाऱ्या व्यक्तीचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य देखील सुधारते. त्यांच्या या कार्यामुळे अनेक जणांना जीवनदान मिळत आहे. अधिक रक्तदान करण्यासाठी युवकांना प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. रक्तदान केल्याने समाजात एकता आणि सहानुभूती निर्माण होते. रक्तदान केल्याने अनेक फायदे होतात
रक्तदान केल्याने शारीरिक स्वास्थ्य सुधारते, रक्तदाब नियंत्रित राहतो आणि हृदयाचे रोग होण्याचा धोका कमी होतो. रक्तदान केल्याने रक्तदात्याला मानसिक सुख आणि आत्मसंतुष्टी मिळते रक्तदान करणे हा एक महत्त्वाचा सामाजिक कार्य आहे.


रक्तदान केल्याने रक्तदात्याला कोणतेही नुकसान होत नाही, उलट त्याचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सुधारते.आसे मत डॉ. रोशन चव्हाण यांनी व्यक्त केले.जालना ब्लड सेंटर चे सामाजिक कार्यकर्ते गणेश चौधरी यांनी दिवसभरात ५१ बॅग रक्त संकलित केल्या यात ११ महीला व ४० युवकांनी असे ५१ जनानी रक्तदान केले. या वेळी हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. स्नेहल चव्हाण, डॉ शितल अटकळ,अमित पाटोळे,विशाल शेळके,संतोष डोईफोडे, नितीन चव्हाण, प्रल्हाद गिरी, रोहन साळवे, प्रवीण कसाब, किरण मोरे, परमेश्वर शिरसागर, आदी युवकानी रक्तदान केले त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी जनसंपर्क अधिकारी योगेश आढाव,सुमित पाटोळे रोहित नारळे, सामाजिक कार्यकर्ते गणेश चौधरी हॉस्पिटल मधील सर्व कर्मचारी यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले

RELATED ARTICLES

Most Popular