
प्रतिनिधी | जालना
ग्रामीण भागामध्ये उन्हाची तीव्रता जाणवत आहे त्यासोबतच पाण्याची चणचणी सुरू झाली आहे. अशावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी सार्वजनिक पाण्याच्या स्रोतावर अवलंबून राहावे लागते. तसेच जिल्हा परिषद शाळेमध्ये येणारे विद्यार्थी हे शेतातून पायी येत असल्यामुळे दप्तरासोबतच पाण्याची बाटली चे ओझे सुद्धा त्यांच्या पाठीवर असते. विद्यार्थ्यांचे ओझे कमी होण्याबरोबरच विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी शाळेतच उपलब्ध होण्याच्या उद्देशाने यशस्वी सोलार चे संचालक वैभव बडदे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुलेनगर शाळेला वाटर फिल्टर भेट दिले.

यावेळी उद्योजक संदीप बडदे यांनी जिल्हा परिषद शाळा म्हणजे ज्ञानदानाचे मंदिर आहे व त्यातील विद्यार्थी सेवा हीच खरी परमेश्वर सेवा आहे. गावकऱ्यांनी कायम शाळेसाठी व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी पुढाकार घेऊन आपली शाळा सुंदर शाळा कशी बनेल याकडे लक्ष दयावे असे आव्हान केले. यावेळी लोकसहभागातून शाळेचा विकास कसा करता येईल यावरही सविस्तर चर्चा करण्यात आली. भोसले यांनी सर्वांचे आभार मानले.यावेळी
नरेश वाढेकर, दगडू बडदे, शाम वाढेकर कैलास गाडेकर, सुभाष गिराम, राजाराम केवट सागर ताई वाढेकर भाग्यश्री वाढेकर, मुख्यध्यापक मुकुंद खरात यांची उपस्थिती होती.






