
तुकाराम राठोड |नांदेड
हिंद दी चादर गुरुतेग बहादुर साहिब यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे वाघाळा येथील मोदी मैदान या ठिकाणी दि.२४ व २५ जानेवारी २०२६ रोजी भव्य-दिव्य कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन अल्पसंख्यांक विभाग महाराष्ट्र शासन व सचखंड गुरुद्वार पंच कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.या कार्यक्रमाला पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंग मान,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,जलसंपदा मंत्री गिरीश महाजन,पालकमंत्री अतुल सावे,पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे,पोहरादेवी चे मंहंत बाबुसिंग महाराज,धर्मप्रचारक शरदराव ढोले,माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण,आ.तुषार राठोड,या कार्यक्रमाचे आयोजक व संयोजक रामेश्वर नाईक,किसन राठोड,डॉ.मोहन चव्हाण,देविदास राठोड व शिक,शिकलकरी,बंजारा,लमाना,मोहियाल,सिंधी,मारवाडी व नामदेव महाराज वारकरी संप्रदाय अनेक संत महंत व महाराष्ट्रात सर्व देशातील अनेक राज्यातून भाविक भक्त या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाला ठिकठिकाणी जेवणाची,पाण्याची,चहा,नाष्ट्या व आरोग्य सेवे ची व्यवस्था करण्यात आली होती.
भजन कीर्तन तसेच भक्तीमय वातावरणात हा कार्यक्रम पार पडला आहे या कार्यक्रमाला जालना तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील धर्म जागरणाचे स्वयंसेवक,कार्यकर्ते,पदाधिकारी तसेच भाविक भक्त दहा ते पंधरा लाख संख्येने हजर होते.कोणतेही अनुचित प्रकार न घडता कार्यक्रम अगदी शांततेत पार पडला आहे.या कार्यक्रमाला पोलीस प्रशासन,स्थानिक प्रशासन व इतर अनेक राज्यातून शासकीय व नागरिकांनी सहकार्य केलेले आहे.याबद्दल कार्यक्रमाचे आयोजक व नियोजन समिती सदस्य यांनी या सर्वांचे आभार मानले.






