
.
प्रतिनिधी|जालना
जालना तालूक्यातील पीरपिंपळगाव येथील देवकी महाविद्यालयात दिनांक 26 जानेवारी रोजी भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बद्रीनाथ मोहिते हे होते, तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रमेश नाना बावणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने करण्यात आली. यानंतर राष्ट्रगीत व देशभक्तीपर गीतांनी परिसर भारावून गेला. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात संविधानाचे महत्त्व, लोकशाही मूल्ये व विद्यार्थ्यांची राष्ट्रउभारणीतली भूमिका यावर प्रकाश टाकला.या कार्यक्रमास शिक्षकवृंद विकास बोरुडे, रामेश्वर मोहिते, गायत्री बावणे, देवकी बावणे, रामेश्वर बावणे, वैजिनाथ रिकामे, अमोल लोखंडे, किशोर खेडेकर, महादेव भोंडणे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. शेवटी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.






