HomeNewsपिंपरी डुकरी येथे शेतकऱ्यांचे अमरण उपोषण प्रशासनाकडून लेखी आश्वासने माघे.

पिंपरी डुकरी येथे शेतकऱ्यांचे अमरण उपोषण प्रशासनाकडून लेखी आश्वासने माघे.

रयत क्रांती संघटना आणि मनसेच्या वतीने तीन दिवस अमरण उपोषण होते सुरू.

प्रतिनिधी जालना.

जालना तालुक्यातील पिंपरी डुकरी फाटा येथे महावितरण सबस्टेशनसमोर शेतकऱ्यांनी सुरू केलेले अमरण उपोषण अखेर यशस्वी ठरले आहे. प्रशासन व महावितरणकडून लेखी आश्वासने मिळाल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.या उपोषणातील प्रमुख मागणी आत्महत्या केलेले शेतकरी भागीरथ रामकिसन शिंदे (रा. हिवरा रोशनगाव) यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याबाबत होती. या मागणीची दखल घेत तहसीलदार, जालना यांनी कृषी विभागाकडून मृत्यूनंतर दहा दिवसांच्या आत दोन लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल, असे लेखी आश्वासन तलाठी ढाकरे यांच्याकडे दिले.यासोबतच शेतकऱ्यांना दिवसा किमान दहा तास पूर्ण दाबाची वीजपुरवठा देण्याची मागणीही मान्य करण्यात आली. ही व्यवस्था जानेवारी अखेरीस पूर्ण करण्यात येईल, असे लेखी आश्वासन महावितरणचे कार्यकारी अभियंता, जालना यांनी दिले.

रयत क्रांती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण मोहिते व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जालना तालुका अध्यक्ष कृष्णा खलसे यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण सुरू होते. प्रशासन व महावितरणकडून लेखी आश्वासने प्राप्त झाल्यानंतर उपोषणकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.यावेळी महसूल विभागाचे ढाकरे, मोजपुरी पोलीस ठाण्याचे एपीआय अतुल पाटील, महसूल विभागाचे श्रीराम राऊत, रामभाऊ मोहिते, डॉ. आप्पासाहेब कदम, सोपान काका भालेकर, कदीर सय्यद, विलास घाटे, मुक्तीराम आढव यांच्यासह सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.या यशस्वी आंदोलनामुळे शेतकऱ्यांच्या मागण्यांना न्याय मिळाल्याची भावना उपस्थित शेतकरी वर्गातून व्यक्त करण्यात आली.

RELATED ARTICLES

Most Popular