
प्रतिनिधी |जालना
नुकत्याच झालेल्या जालना शहर महानगरपालिकेच्या निवडणुक निकालाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने भाग्यनगर येथील माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या कार्यालयात विजयी व पराभूत अशा दोन्ही संयुक्त बैठक घेण्यात आली. सर्व उपस्थितांना माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी व्यासपीठावर संपर्कप्रमुख भास्करराव अंबेकर, पंडितराव भुतेकर, सह संपर्कप्रमुख सुनील किनगावकर, जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, उपजिल्हाप्रमुख संतोष मोहिते यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना अर्जुनराव खोतकर म्हणाले की, कोणतीही निवडणूक म्हटलं की जय पराजय हा असतोच. आपण सर्वांनी अत्यंत कठोर परिश्रम घेऊन निवडणूक लढविली परंतु अपेक्षित यश जरी आपल्याला मिळाले नाही. परंतु कोणीही अपयशाने विचलित न होता सर्व उमेदवार व पदाधिकाऱ्यांनी 24 तास जनतेच्या सेवेत तत्पर राहून कार्य करावे. ही मायबाप जनता पुन्हा तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही. पालिकेची निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची निवडणूक असली तरीही कोणताही व्यक्ती हा सर्वच वेळा विजय होऊ शकतो असे नाही. अगदी मी सुद्धा अनेक वेळा पराभव पचवून पुन्हा नव्या उमेदीने कामाला लागलेला आहे. त्यामुळे कोणत्याही उमेदवाराने पराभवाने खचून जायचे नाही निवडून आलेले आपले उमेदवार कमी असले तरीही आपल्या सर्वांच्या प्रभागाचे प्रतिनिधित्व ते नगरपालिकेत करणार आहेत. तुमच्या अडीअडचणीसाठी सभागृह दणाणून सोडल्याशिवाय राहणार नाहीत, असे ते म्हणाले .आपले नेते व राज्याच्घे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे नगर विकास खात्याचे मंत्री आहेत. त्यामुळे आपल्या प्रभागातील समस्या सोडविण्यासाठी ते सदैव आपल्या पाठीशी ठाम उभे आहेत हे लक्ष्यात घ्या.
विजय उमेदवारांनीही विजयाने हुरळून न जाता अत्यंत नम्रतापूर्वक जनतेशी जोडून राहावे पराभूत झालेल्यांना सोबत घेऊन जनतेच्या सुखदुःखात धावून जावे व पक्षावर त्यांनी टाकलेला विश्वास सार्थ करून दाखवावा.

यावेळी बोलताना संपर्कप्रमुख भास्करराव अंबेकर यांनीही सविस्तर मार्गदर्शन करताना म्हटले की, मी वर्षे नगरपालिकेत नगरसेवक, नगराध्यक्ष आशा पदांवर काम केले आहे. आपणास जनतेची सेवा करण्याची अत्यंत चांगली संधी मिळालेली आहे. आपण सातत्याने आपल्या प्रभागावर अत्यंत बारकाईने लक्ष देऊन प्रभागातील सर्व नागरिकांना येणाऱ्या अडीअडचणी कशा दूर करता येतील, त्यांच्या दैनंदिन जीवनातील समस्या कशा दूर करता येतील यासाठी सातत्याने प्रयत्न करा. असे सांगून पराभूत उमेदवारांना सांगितले कि, अपयशाने खचून न जाता नव्या उमेदीने काम करावे.
जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांनीही मार्गदर्शन करताना उमेदवारांना पक्ष संघटन मजबूत करून आपल्या पक्षाचे अस्तित्व शहरात भक्कम करून आपल्या पक्षाचा जनाधार आणखी वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे. आगामी काळातही आपल्याला अनेक संधी वेळोवेळी उपलब्ध होतील त्यामुळे पराभवाने निराश होऊ नका.
या बैठकीत नवनिर्वाचित नगरसेवक पूजा योगेश भगत, दीपक रविशंकर राठोड, कमलेश जगदीश खरे, पूजा दिनेश भगत, दुर्गेश किशनलाल काठोटीवाले, अब्दुल कबीर अजित शेख, सत्यभामा विजय जाधव, संजय पंढरीनाथ डुकरे, निखिल रमेशराव पगारे, उषाताई अशोकराव पांगरकर, दर्शना विजय झोल, अमोल ठाकूर यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवसेनेचे सर्व आजी-माजी पदाधिकारी निवडणुकीतील उमेदवार
विष्णू पाचफुले, गणेश राऊत, फिरोजलाला तांबोळी, हरेश देवावाले, बाला परदेशी, राहुल हिवराळे, अशोक सांबरे, अभिषेक काबलीये, मनोज लाखोले, आदेश कोटेचा, नजीर शेख, सोपान गायकवाड, चंद्रशेखर कोत्ताकोंडा, सचिन झारखंडे, अखिम शेख, लखन कनिसे, देवेंद्र बुंदेले, तृप्ती प्रसन्ना कोठारी, देवेंद्र बुंदेले, विकास शिरसागर, गणेश सरोदे, हर्षद खाकीवाले, रितेश भक्कड, महेश दुसाने, संतोष सिंग ठाकूर शुभम टेकाळे, अब्दुल कुरेशी, राजाराम गायकवाड, संताजी वाघमारे, राधाकिसन दाभाडे, भानुदास धोत्रे, गणेश राऊत, ज्ञानेश्वर सुपारकर, शिवाजी लाड, विशाल बनकर, रंयोगेश रत्नपारखे, शरद ढाकणे, राजू पवार, बबन मगरे, दीपक वैद्य यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.





