
प्रतिनिधी | सिंधी काळेगाव
जालना तालुक्यातील खरपुडी येथे सुरू असलेल्या क्रिकेट स्पर्धेत सिंधीकाळेगाव येथील क्रिकेट संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत द्वितीय क्रमांक मिळवून गावाचा नावलौकिक वाढवला आहे. सात वर्षांपासून ज्या ट्रॉफीची युवकांना प्रतीक्षा होती. ती अखेर यावर्षी पूर्ण झाली असून हा क्षण संपूर्ण गावासाठी अभिमानास्पद ठरला आहे.या यशस्वी संघामध्ये अमोल गिराम, माधव वाघ, समीर पठाण, दिलीप गिराम, जगन गिराम.प्रदीप मोरे, एकनाथ गिराम, गणेश मगर, सिराज शेख, शोएब शेख,करण पवार,अल्तामश पठाण, करण राऊत, आदनान शेख आदित्य गिराम व बिट्ट्या या खेळाडूंनी मेहनत संघभावना व जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केले.हा सामना पाहण्यासाठी व संघाचे मनोबल वाढवण्यासाठी सिंधी काळेगावचे सरपंच आबाजी गिराम, भरत गिराम, नासेर जुबेर सय्यद प्रकाश गिराम पठाण तसेच सावता CC चे सदस्य व मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते. सर्वांनी खेळाडूंना प्रोत्साहन देत टाळ्यांच्या गजरात उत्साह वाढवला.

स्पर्धेनंतर संघाने ट्रॉफीसह गावामध्ये भव्य मिरवणूक काढली. खेळाडूंवर गावकऱ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला.या यशामुळे सिंधीकाळेगावाचे नाव तालुका व परिसरात उज्ज्वल झाले असून, पुढील काळात संघ आणखी मोठी कामगिरी करेल, असा विश्वास गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे.





