HomeNewsदमट वातावरणामुळे हरभरा व मक्यावर अळीचा प्रादुर्भाव; शेतकरी संकटात

दमट वातावरणामुळे हरभरा व मक्यावर अळीचा प्रादुर्भाव; शेतकरी संकटात

जालना तालुक्यात बदलत्या हवामानाचा रब्बी पिकांना फटका.

प्रतिनिधी|सिंधी काळेगाव

जालना तालुक्यात गेल्या चार दिवसापासून हवामानात बदल होऊन दमट वातावरण निर्माण झाल्याने रब्बीच़्या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. थंडी गायब झाल्याने पिकांची वाढ खुंटली आहे.त्याच बरोबर मका ,हरबरा सह अन्य पिकांवर अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे.त्यामुळे शेतकर्यांना महागडी औषधी फवारणी करावी लागत आहे. त्यामुळे कृषी विभागाने शेतकर्यांना योग्य मार्गदर्शन करावे अशी मागणी ग्रामीन भागात होत आहे.


खरीपात पावसाने शेतकर्याचे मोठे नुकसान गेल्याने अनेक शेतकर्यांनी कपाशी उपटून रब्बीच्या पिकाची पेरनी केली होती. खरीपात झालेले नुकसान रब्बी निघेल अशी आशा शेतकर्यांना होती.बदलत्या हवामानाचा रब्बी हंगामावर मोठा परिणाम दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात वाढलेली आर्द्रता, ढगाळ हवामान तसेच सकाळ-संध्याकाळ पडणारी दव यामुळे रब्बी पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. याचा फटका विशेषतः हरभरा व मका पिकांना बसत असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

गेल्या चार पाच दिवसापासून वातावरणात झालेल्या बदलामुळे शेतातील पिकावर मोठा परिणाम दिसून येत आहे.खरीपाचे पिके काढून मोठ्या हिमतीने मकाची लागवड केली होती. परतू आता मोठ्या प्रमानात औषधी फवारावी लागत आहे. एकिकडे पिकांना योग्य भाव नाही,तर दुसरीकडे शेतीत रोगराई मुळे खर्च मोठा वाढला आहे.त्यामुळे हा समतोल राखने अवघड झाले आहे.
-पंढरीनाथ गिराम शेतकरी

मका,हरभरा पिकावर अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळून येत आहे.अनेक शेतांमध्ये पिकाची वाढ खुंटली असून उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच मक्याच्या पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढत असून पाने कुरतडली जात असल्याचे दिसून येत आहे. दमट वातावरणामुळे करपा, बुरशीजन्य रोग व पानांवरील डाग यांसारख्या समस्याही वाढल्या आहेत.या रोगराईमुळे शेतकऱ्यांना वारंवार फवारणी करावी लागत असून महागडी कीटकनाशके व बुरशीनाशके खरेदी करावी लागत आहेत. त्यामुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे.

अळी नियंत्रणासाठी तज्ज्ञांचा सल्ला
जालना तालुक्यात हरभरा व मक्यावर अळीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकऱ्यांनी पिकांची नियमित पाहणी करावी, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे. अळीची अंडी किंवा सुरुवातीच्या अवस्थेतील अळ्या दिसताच तातडीने कीटकनाशकांची फवारणी करावी. अनावश्यक औषधांचा वापर टाळावा, एकाच औषधाची पुनःपुन्हा फवारणी करू नये, तसेच हवामान कोरडे असताना फवारणी केल्यास परिणामकारक नियंत्रण मिळू शकते.

RELATED ARTICLES

Most Popular