जालना महानगरपालिका भाजपाला बहूमताने विजयी करा. विकासाची जबाबदारी माझी.-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
155

प्रतिनिधी|जालना

जालना महापालिकेची निवडणूक निमित्त आता वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.अशातच सोमवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जालनामध्ये जाहीर सभा घेऊन महानगरपालिका भाजपच्या ताब्यात द्या विकासाची जबाबदारी माझी अशी जाहीर सभेतून नागरिकांना आवाहनन केले आहे.डॉक्टर फेजर बॉईज मुलांची शाळा या ठिकाणी झालेल्या सभेतून त्यांनी एक प्रकारची जालनेकरांना त्यानी विकासासाठी भाजपाला बहुमताने निवडून द्या.अशी साद घातली.या सभेला नागरीकांचा चांगला सहभाग दिसून आला.

जालना महानगरपालिका निवडणूक म्हणजे शहराला विकासाच्या वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याची संधी जालनेकरांसाठी मिळाली आहे. या संधीचे सोने करा. जालना महानगरपालिका निवडणुकीत सर्व नगरसेवकांना कमळ या चिन्हा समोरील बटण दाबून प्रचंड बहुमताने निवडणूक द्या. विकासाची जबाबदारी माझी आहे,” असे वचन जालना येथे झालेल्य जाहीर सभेतून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.या सभेसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे,आ.बबनराव लोणीकर,आ.संतोष दानवे,आ.नारायण कुचे,माजी आमदार कैलास गोरंट्याल तसेच नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार तथा पदाधिकारी कार्यकर्ते मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.