
प्रतिनिधी | जालना
भगवंत सेवक,बारा धाम निर्माते तसेच राष्ट्रीय बंजारा परिषदचे संस्थापक अध्यक्ष किसन राठोड यांच्या सक्षम नेतृत्वाखाली डॉ.मोहन चव्हाण यांची राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली आहे.या निवडीबद्दल अंजेभाऊ चव्हाण यांनी अभिनंदन केले आहे.यावेळी अंजेभाऊ चव्हाण म्हणाले की,डॉ.मोहन चव्हाण हे अत्यंत सुशिक्षित,धाडसी,दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्व आणि संघर्षातून घडलेले नेतृत्व आहे.बंजारा समाजाच्या विविध प्रश्नांबाबत त्यांची भूमिका नेहमी ठाम राहिली असून,सरकारदरबारी त्यांची चांगली पकड असल्यामुळे येत्या काळात बंजारा समाजाचे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील,असा ठाम विश्वास आम्हाला वाटत आहे.डॉ.मोहन चव्हाण यांनी या अगोदर राष्ट्रीय बंजारा परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदाची जबाबदारी पार पाडली आहे.त्यामुळे त्यांचा दांडगा जनसंपर्क असून,त्यांचा अनुभव संघटनेच्या विस्तारीकरणाच्या माध्यमातून भारतभर पोहोचवण्यासाठी मदत होईल.तसेच पंडित राठोड यांचा अनुभव व कौशल्य यांची सांगड घालून राष्ट्रीय बंजारा परिषदेला नवी उंची व भरारी मिळेल व संघटनेला अधिक बळकटी येईल.आणि बंजारा समाजाची एक स्वतंत्र,सक्षम व अभिमानास्पद ओळख भारतभर निर्माण होण्यासाठी फारसा वेळ लागणार नाही,हे मात्र नक्की सांगावे लागेल.तसेच पुन्हा एकदा डॉ.मोहन चव्हाण यांना राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीबद्दल हार्दिक अभिनंदन व भावी कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.






