
प्रतिनिधी|जालना
मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण” योजनेअंतर्गत चुकीच्या e-KYC मुळे ज्या लाभार्थी महिलांचे अनुदान थांबले आहे, अशा लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. संबंधित महिलांनी ३१ मार्च २०२६ पूर्वी आपली e-KYC दुरुस्त करून घ्यावी, असे आवाहन योजनेचे जालना जिल्हा सदस्य संतोष ढेंगळे यांनी केले आहे.
योजनेअंतर्गत अनेक लाभार्थी महिलांनी e-KYC प्रक्रिया पूर्ण केली असली, तरी ती करताना “लाभार्थीच्या कुटुंबातील सदस्य सरकारी/निमसरकारी/कंत्राटी कर्मचारी नाहीत किंवा निवृत्तीवेतन घेत नाहीत” या अटीसंदर्भात नजरचुकीने चुकीचा पर्याय निवडण्यात आला. त्यामुळे काही महिलांचे हप्ते थांबले आहेत.
अशा महिलांसाठी शासनाने ऑनलाईन e-KYC मध्ये सुधारणा करण्याची संधी उपलब्ध करून दिली असून ही सुविधा ३१ मार्च २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे. तरी सर्व पात्र लाडक्या बहिणींनी दिलेल्या मुदतीत e-KYC दुरुस्त करून घ्यावी, जेणेकरून थांबलेले अनुदान पुन्हा सुरू होईल, असेही संतोष ढेंगळे यांनी सांगितले






