प्रतिनिधी |जालना
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त टाकरवन ग्रामपंचायत कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सामाजिक न्याय, समता, बंधुता आणि स्वातंत्र्याच्या तत्त्वांची आठवण उपस्थितांनी केली.कार्यक्रमाला उपसरपंच भानुदासराव खलसे, ग्रामपंचायत सदस्य श्याम चिंतामण, श्याम शिंदे, विष्णू खडेकर, शिवाजी जाधव, बाळू बेढे, शिवाजी खलसे, गोविंद पोहेकर, निलेश भुतेकर, संजय भुतेकर, पुंजाराम भुतेकर तसेच काशिनाथ मिसाळ यांसह ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.या वेळी वक्त्यांनी डॉ. आंबेडकर यांनी समाजातील दुर्बल, पीडित, शोषित घटकांच्या उन्नतीसाठी केलेल्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले. महापरिनिर्वाण दिनानिमित्त ग्रामस्थांनी “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा संदेश पुन्हा उजळणीस आणत सामाजिक बांधिलकी दृढ करण्याची प्रतिज्ञा व्यक्त केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचित, शोषित समाजाला उभारी देऊन समतेचा प्रकाश दिला.त्यांनी दिलेली राज्यघटना ही आपल्या स्वातंत्र्याची आणि हक्कांची भक्कम भिंत आहे.“शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा त्यांचा संदेश आजही तितकाच प्रेरणादायी आहे.समाजातील भेदभाव दूर करण्यासाठी बाबासाहेबांचे विचार आचरणात आणणे गरजेचे आहे.नवीन पिढीने संविधानाचे मूल्य जाणून जबाबदारीने पुढे जावे.समता, न्याय आणि बंधुता हीच आपली खरी ओळख ठरावी.गावागावांत शिक्षणाचा प्रसार झाला तर परिवर्तन नक्की घडेल.







