Homeधर्म-समाजश्रीक्षेत्र नेर येथे श्री मडकेश्वर महादेव व संत सावता महाराज यांची मूर्ती...

श्रीक्षेत्र नेर येथे श्री मडकेश्वर महादेव व संत सावता महाराज यांची मूर्ती स्थापना सोहळा मोठ्या उत्साहात साजरा.

नेर येथे मुर्ती स्थापना.

श्री मडकेश्वर महादेव देवता मूर्ती व संत श्रेष्ठ शिरोमणी सावता महाराज मूर्ती स्थापना.

नेर |गणेश तरासे

जालना तालुक्यातील श्री क्षेत्र नेर येथे नुकताच दोन दिवशी उत्सवामध्ये श्री मडकेश्वर महादेव देवता मूर्ती व संत श्रेष्ठ शिरोमणी सावता महाराज मूर्ती स्थापना व कलश रोहन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
य कार्यक्रमांमध्ये पहिल्या दिवशी अग्निस्थापना,जलाधीवास, धान्यधीवास, शयाधीवास,हवन,श्रीची मिरवणूक व रात्री हरी किर्तन यामध्ये ह. भ.प.पांडुरंग महाराज वाघमारे (पीर कल्याण) यांचे हरिकीर्तन झाले. तसेच दुसऱ्या दिवशी स्थापित देवता पूजन व श्री ची प्राणप्रतिष्ठा परमपूज्य भागवत गिरीजी महाराज व श्री महंत बालक गिरीजी महाराज (नांगरतास,शंभू महादेव,ओंकारेश्वर) मठाधिपती यांच्या शुभहस्ते करण्यात आले व नंतर महाप्रसाद झाला.
या कार्यक्रमाला मोठ्या संख्येमध्ये भाविक भक्त व नेर पंचक्रोशीतील नागरिक पाहुणेराहूळे तसेच गावातील लेकी-बाळी यांनी मोठ्या संख्येमध्ये उपस्थिती होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता श्रीवटेश्वर सप्ताह कमिटीचे अध्यक्ष श्री शिवाजी महाराज उफाड तसेच श्री वटेश्वर वारकरी शिक्षण संस्थाचे अध्यक्ष सचिव व विद्यार्थी वर्ग,संत सावता भक्त मंडळी व गावातील सर्व नागरिकांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

Most Popular