
प्रतिनिधी |जालना
जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस व गारपीट होत आहे .त्यामुळे शेतकर्यांचा रब्बी हंगाम हा पाण्यात बुडाला आहे व शेतकर्यांचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हा चिंताग्रस्त झालेला आहे.

दरम्यान शासनाने त्वरित नुकसान ग्रस्त पिकाचे पंचनामे करून शेतकर्यांना आर्थिक मदत देण्यात यावी.जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस व गारपीट झालेली आहे.त्यामध्ये हरभरा.गहू.द्राक्ष.डाळिंब.मोसंबी.कांदा इत्यादी पिकांचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळे शेतकर्यांसमोर नवीन संकट उभे राहिले आहे तरीही शासनाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान ग्रस्त शेतकर्यांना भरपाई करून देण्यात यावी अशी मागणी जालना युवासेना उपजिल्हाप्रमुख गणेश मोहिते यांनी केली आहे.






