HomeNewsउखळी येथे मराठी भाषा गौरव दिन साजरा.

उखळी येथे मराठी भाषा गौरव दिन साजरा.

प्रतिनिधी |सिंधी काळेगाव

जालना तालुक्यातील उखळी येथे दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उखळी केंद्र सावंगी तलान येथे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी भाषा गौरव दिन मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. मराठी भाषेचा समृद्ध वारसा,साहित्य संवर्धन, सन्मान व अभिमान आणि सांस्कृतिक गौरव वाढवण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात आला.दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शाळा स्तरावर विविध उपक्रम आयोजित करण्यात आले.यामध्ये मराठी साहित्याचे वाचन,कविता सादरीकरण व राज्यगीताचे लेखन घेण्यात आले.उपस्थित पालक, ग्रामस्थ व शालेय मुलांना मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मार्गदर्शन करण्यात आले.उपक्रमासाठी मार्गदर्शन केंद्रप्रमुख भागवत जेटेवाड यांनी केले.यावेळी शाळेचे शिक्षक बाबासाहेब गायकवाड, मुख्याध्यापक नारायण माहोरे,शिवनगर शाळेचे मुख्याध्यापक अर्जुन निकम, अंगणवाडी ताई मनकर्णा जाधव, पूनम जाधव, चांदणी गायकवाड,युवराज राठोड, करण जाधव, नितीन जाधव, रिंकू जाधव,काजल पवार, उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular