
गिरीराज गिराम |जालना
ज्ञानतिर्थ इंग्लिश स्कूल, वखारी येथील विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय गणित (IMO) व विज्ञान (NSO) ऑलिम्पियाड परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करत शाळेचा लौकिक उंचावला आहे. विविध इयत्तांमधील तब्बल ४१ विद्यार्थ्यांनी सुवर्णपदके पटकावली, ही कामगिरी शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचे द्योतक ठरली आहे.या ऑलिम्पियाड परीक्षा विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेचा, तर्कशक्तीचा, समस्या सोडविण्याच्या कौशल्याचा आणि संकल्पनात्मक आकलनाचा कस लावणाऱ्या मानल्या जातात. पाठांतरावर आधारित नसलेल्या या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांच्या विश्लेषणात्मक विचारशक्तीची खरी परीक्षा होते.या यशानिमित्त शाळेत विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. शाळेचे अध्यक्ष भगवानराव खैरे व प्राचार्य अण्णाभाऊ भालमोडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. पालकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून समाधान व्यक्त केले.

गणित (IMO) ऑलिम्पियाडमधील यश
इयत्ता १ ली ते ८ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी नोंदवली.
इयत्ता १ ली: शौर्य क्षीरसागर, यशराज मोहिते, अथर्व क्षीरसागर – स्कूल रँक १
इयत्ता २ री: युवराज ढाकणे (१ ला), शिवराज वाघमारे (२ रा), गायत्री तिरुखे व श्रीकांत डोंगरे (३ रे)
इयत्ता ३ री: भैरवी मेहत्रे (१ ली), रुद्र पिंपळे (२ रा), समाधान चव्हाण (३ रा)
इयत्ता ४ थी: गणेश डीखुळे (१ ला), आरव लकडे (२ रा), गायत्री चौधरी (३ री)
इयत्ता ५ वी: प्रेम बोरुडे (१ ला), यश जारे (२ रा), आर्या खरात (३ री)
इयत्ता ६ वी: प्रतीक्षा घुले (१ ली), ओमराज चव्हाण (२ रा), विलास साबळे (३ रा)
इयत्ता ७ वी: विशाल सरकटे (१ ला), सिद्धी उगले (२ री), अर्णव वाघमारे (३ रा)
इयत्ता ८ वी: ऋतुजा साळवे (१ ली)
विज्ञान (NSO) ऑलिम्पियाडमधील यश
इयत्ता ३ री: जयश्री कवडे, आराध्या इंगोले – प्रथम
इयत्ता ७ वी: आदित्य यशवंते (१ ला), युवराज पुंड (२ रा), राणी तोडकर (३ री)
इयत्ता ८ वी: सम्यका भालमोडे – प्रथम
इयत्ता ९ वी: शिवकन्या थेटे – प्रथम

विशेष मार्गदर्शनामुळे यश
शाळेत विद्यार्थ्यांना ऑलिम्पियाडसाठी विशेष प्रशिक्षण दिले जाते. सराव चाचण्या, तर्कशक्ती वाढविणारे उपक्रम, वेळेचे व्यवस्थापन आणि संकल्पना स्पष्ट करण्यासाठी विशेष वर्ग घेतले जातात. शिक्षकांकडून वैयक्तिक मार्गदर्शन दिले जाते, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या कमकुवत बाबींवर प्रभावी काम होते.
“विद्यार्थ्यांचे परिश्रम, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यामुळेच हे यश शक्य झाले,” असे मत शाळा प्रशासनाने व्यक्त केले.
या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण असून भविष्यातही विद्यार्थी अशाच प्रकारे यशाची परंपरा कायम ठेवतील, असा विश्वास व्यक्त होत आहे.



