HomeNewsगोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण यांच्या हस्ते जालना ग्रामीण मधील 11...

गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण यांच्या हस्ते जालना ग्रामीण मधील 11 शाखेचे उद्घाटन

प्रतिनिधी|जालना

जालना तालुक्यातील मौजपुरी सर्कल मधील तांड्यात गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण यांनी भेट दिली व तब्बल एका दिवसात गोर सेनेचे 11 शाखेचे केले उद्घाटन.तसेच या प्रसंगी डीजे व मोटरसायकल रॅली काढत भव्य-दिव्य वातावरणामध्ये शाखा उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला आहे.जालना ग्रामीण मधील बाजीउंमृद तांडा,पारेगाव वाडी तांडा,पारेगाव तांडा,सावंगी तांडा,दहिफळ तांडा,पाहेगाव तांडा,साळेगाव तांडा,धांडेगाव तांडा,मानेगाव वाडी तांडा-०१,मानेगाव वाडी तांडा-०२, व लालदेव फाटा या ठिकाणी शाखेचे उद्घाटन करण्यात आले.तसेच बंजारा समाजासाठी न्याय,हक्क व अधिकार आणि सन्मानासाठी गोरशिकवाडी पुरस्कृत व गोररसेना ही संघटना महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यात सक्रियपणे काम करीत आहे.व गोरसेना या संघटनेच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी अहोरात्र परिश्रम व मेहनत घेत आहे.लालदेव फाटा येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत संदेश चव्हाण म्हणाले की,भारत स्वतंत्र झाल्यानंतर बंजारा समाज व तांडा अनेक विकासापासून कोसो दूर आहेत.वाडी,वस्ती,तांड्यामध्ये मूलभूत सोयी-सुविधा आतापर्यंत उपलब्ध झालेले नाही.बंजारा समाजातील महिला व पुरुषावर दिवसेंदिवस अन्याय-अत्याचार वाढत आहे.पण पोलीस प्रशासन राजकीय दबावापोटी योग्य ती कारवाई करताना दिसत नाही.बंजारा समाजावर होणाऱ्या अन्यायाला खतपाणी घालण्याचं काम होताना पाहाव्यास मिळत आहे.तसेच अनेक राजकीय पक्ष समाजाला तिकीट देत नसल्यामुळे बंजारा समाज हा राजकीय क्षेत्रापासून कोसो दूर आहे.त्यामुळे आता याची चिंता मिटली असुन,येणारया जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी संघटन मजबूत करून तयारीला लागावे असे आवाहन संदेश चव्हाण यांनी सांगितले आहे.यावेळी गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण,अजय चव्हाण,छबुराव राठोड,संतोष चव्हाण,तुकाराम राठोड,संदिप चव्हाण,शिवाजी चव्हाण,विकास चव्हाण,मिथुन चव्हाण,अनिल राठोड,अमोल पवार,बाळू राठोड,गणेश राठोड,अजय राठोड,पंकज चव्हाण,प्रकाश राठोड,अमोल राठोड,अमोल चव्हाण,निरंजन चव्हाण,लहु चव्हाण,पंकज चव्हाण,शक्ती राठोड,पंडित पवार,किसन राठोड,बाबू सिंग चव्हाण,राम राठोड,विष्णू राठोड,शिवाजी राठोड,संजय राठोड,विजय चव्हाण व ईतर अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular