HomeNewsजालना जिल्ह्यातील अवकाळी पाऊस अन् गारपीट.द्राक्ष,मोसंबी आदी पिकाचे नुकसान.

जालना जिल्ह्यातील अवकाळी पाऊस अन् गारपीट.द्राक्ष,मोसंबी आदी पिकाचे नुकसान.

नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून सरसकट मदत द्यावी अशी शिवसेना तालुका प्रमुख भगवानराव अंभोरे याची मागणी.

प्रतिनिधी |जालना

जालना जिल्ह्यातील काही भागांमध्ये गारपीटमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे दरम्यान या बेमोसमी पावसाचा बऱ्याच भागात फटका बसला आहे या नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत करावी, गारपीट व पावसामुळे फळबागासह अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.गुरूवारी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटमुळे द्राक्ष,ज्वारी,हरभरा,गहू मका आदी पिकाचे नुकसान झाले आहे त्यामुळे शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख भगवानराव अंभोेरे यांनी केली आहे.


जालना जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस व गारपीटमुळे शेतकर्यांचे नुकसान झाले आहे.यात ज्वारी,कपाशी द्राक्ष ,मोसंबी,आदी पिकाला फटका बसला आहे.कडवंची परिसरात द्राक्ष बागांचे अतोनात नुकसान झाले आहे. तरिही शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी.

भगवानराव अंभोरे शिवसेना तालुका प्रमुख जालना.


RELATED ARTICLES

Most Popular