HomeNewsशेतकऱ्यांना दिवसा १० तास पूर्ण दाबाची थ्री-फेज लाईट द्या.

शेतकऱ्यांना दिवसा १० तास पूर्ण दाबाची थ्री-फेज लाईट द्या.

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी जालना मंठा महामार्गावर रास्तारोको आंदोलन.

मनसे आणि रयत क्रांती संघटनेचे मंठा रोड वरील पिंपरी – डुकरी स्तारोको आंदोलन.

प्रतिनिधी | जालना

रयत शेतकरी संघटना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या संयुक्त विद्यमाने जालना–मंठा महामार्गावरील पिंपरी डुकरी फाटा येथे महावितरण कार्यालयासमोर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या विविध ज्वलंत प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.आंदोलनातील प्रमुख मागण्यांमध्ये शेतकऱ्यांना दिवसा किमान १० तास पूर्ण दाबाची थ्री-फेज वीज देण्यात यावी, तसेच जालना जिल्ह्यातील वाढत्या अडचणी लक्षात घेता २४ तास वीजपुरवठा करण्यात यावा, अशी ठाम मागणी करण्यात आली. शेतकरी शेतात वास्तव्यास असल्याने बिबट्यांच्या हल्ल्यांचा धोका वाढला असून, शेतकरी, शेतकरी महिला व जनावरे यांना संरक्षण देणे आवश्यक असल्याचे आंदोलनकर्त्यांनी नमूद केले.याशिवाय शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. हिवरा रोषणगाव (ता. जालना) येथील भगिरथ रामकिसन शिंदे (वय ३५) यांनी शेत वाहून गेल्याने नैराश्यातून २४ डिसेंबर २०२५ रोजी आत्महत्या केल्याच्या घटनेचा तीव्र निषेध आंदोलनात नोंदविण्यात आला.बुलढाणा जिल्ह्यातील तहसीलदारांकडून शेतकऱ्यांची झालेल्या कथित विटंबनेचाही निषेध करण्यात आला. संबंधित तहसीलदार निलंबित होईपर्यंत राज्यभर रस्ता रोको आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.अखेरीस, जालना नायब तहसीलदार चौधरी यांच्या निवेदन स्वीकारल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी रयत क्रांती संघटनेचे जालना जिल्हाध्यक्ष लक्ष्मण मोहिते, सचिव मंदाकिनी मोहिते, रामभाऊ मोहिते, सिताबाई मोहिते, प्रमेश्वर गरबडे, डॉ. आप्पासाहेब कदम, मनसे तालुकाध्यक्ष कृष्णा खलसे, समाजसेवक कदिर बापू सय्यद यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular