
प्रतिनिधी| मुंबई
भिकन जाधव यांची संत सेवालाल महाराज बंजारा लमाण तांडा समृद्धी योजनेच्या राज्य समन्वयक पदी नुकताच काही दिवसापूर्वी नियुक्ती झाली आहे.ही नियुक्ती झाल्याबद्दल अंजेभाऊ चव्हाण(प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रीय बंजारा परिषद महाराष्ट्र),संदीप राठोड(मराठवाडा अध्यक्ष),कैलास चव्हाण (ग्रा.सदस्य) यांनी मुंबई येथील कार्यालय येथे जाऊन पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आहे.यावेळी अनेक मान्यवरांकडून त्यांना शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.भिकन जाधव यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक तांड्यासाठी विकास कामांसाठी शासनाकडून निधी मंजूर करून राहिलेले कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.भिकन जाधव यांना पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा.






