
प्रतिनिधी |सिंधी काळेगाव
जालना तालुक्यातील सिंधीकाळेगाव येथे हिना मार्ट चषक-२ यांच्या वतीने भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेचे मुख्य आयोजक कैसर सय्यद, दिलीप गिराम, गालेब सय्यद, अमीन सय्यद व मुन्ना चव्हाण हे होते.या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ₹31,000/- सद्दाम खान यांच्या हस्ते देण्यात आले, तरद्वितीय पारितोषिक ₹15,000/- शौकत सय्यद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

या स्पर्धेत पवार सी.सी. संघाने प्रथम पारितोषिकाचा मान पटकावला, तरआयकॉन संघाने द्वितीय क्रमांक मिळवला.स्पर्धेदरम्यान सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून अमोल साळवे, तरउत्कृष्ट गोलंदाज म्हणून पवार सर यांना सन्मानित करण्यात आले.या क्रिकेट स्पर्धेत एकूण आठ संघांनी सहभाग घेतला होता.स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी कुसुम ॲग्रो टुरिझम, एस.के. स्वीट मार्ट, हिना मार्ट व गिराम मंडप डेकोरेशन यांनी मोलाचे सहकार्य केले.






