HomeNewsएस.आर.टी तंत्रज्ञानाचा महाराष्ट्रात बोलबाला; शेतकरीच बनले शेती शाळांचे गुरु.

एस.आर.टी तंत्रज्ञानाचा महाराष्ट्रात बोलबाला; शेतकरीच बनले शेती शाळांचे गुरु.

स्टार प्रचारक विठलराव वैद्य करतात शेतकर्याना योग्य मार्गदर्शन.

गिरीराज गिराम {मुख संपादक दिव्य मराठवाडा}

जालना जिल्ह्यात तब्बल ३०० तर संपूर्ण महाराष्ट्रात १५ हजारांवर शेती एसआरटी पद्धतीने.


शेती क्षेत्रात दिवसेंदिवस आधुनिक तंत्रज्ञानाची भर पडत असली, तरी कमी खर्चात जास्त उत्पादन व जमिनीची सुपीकता राखणारे ‘एस.आर.टी.’ हे तंत्रज्ञान महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये वेगाने लोकप्रिय होत आहे. जमिनीत नैसर्गिक सुपीकता वाढवणे, उत्पादन क्षमता उंचावणे आणि अनावश्यक खर्चाला आळा घालणे यामुळे एस.आर.टी. तंत्रज्ञानाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असून आज शेतकरीच शेतकऱ्यांना शिकवत ‘शेती शाळा’ घेऊन या तंत्रज्ञानाचा प्रसार करत आहेत.

जालना जिल्ह्यातील ३०० शेतकऱ्यांनी हे तंत्रज्ञान अवलंबून प्रत्यक्ष फायदा घेतला आहे. यामध्ये विठ्ठल वैद्य (मु. कुसळी ता. बदनापूर), विष्णू पंत गिराम, डॉ. गणेश पोटे, ज्ञानेश्वर शिंगारे, दीनकर काळे यांनी कमी खर्चात उत्पादन घेत आदर्श निर्माण केला आहे. विशेष म्हणजे हिंगोली, वाशिम, बुलढाणा, बीड, संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील शेतकरी विठ्ठल वैद्य यांच्या प्रक्षेत्रावर प्रत्यक्ष प्रशिक्षण घेऊन आपल्या शेतीत हे तंत्रज्ञान राबवत आहेत.

सध्या जालना जिल्ह्यात तब्बल ३०० तर संपूर्ण महाराष्ट्रात १५ हजारांहून अधिक शेतकरी एस.आर.टी. पद्धतीने शेती करत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.या तंत्रज्ञानाला सरकारी पातळीवरही प्रोत्साहन मिळत असून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, कृषी विज्ञान केंद्र बदनापूर व खरपूडी येथे या पद्धतीचे प्रायोगिक प्लॉट कार्यरत आहेत. तसेच व्हाईट गोल्ड ट्रस्ट, संभाजीनगर यांनीही आपल्या प्रक्षेत्रावर एस.आर.टी. तंत्रज्ञानाची अंमलबजावणी सुरू केली आहे.एस.आर.टी. तंत्रज्ञानामुळे कमी खर्चात उत्पादन वाढ आणि शाश्वत शेतीची दिशा मिळत असल्याने ही नवकल्पना महाराष्ट्रात जलद गतीने रुजत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular