HomeNewsसिंधीकाळेगाव येथील जिल्हा परिषद शाळा यांनी प्रश्नमंजुषा स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविल्याबद्दल शालेय...

सिंधीकाळेगाव येथील जिल्हा परिषद शाळा यांनी प्रश्नमंजुषा स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविल्याबद्दल शालेय साहीत्य वाटप.

सामादिक कार्यकर्ते गणेश गिराम यांचा स्तुत्य उपक्रम.

प्रतिनिधी | सिंधी काळेगाव

सिंधीकाळेगाव शाळेत साहीत्य वाटप करण्यात आले.

जालना तालुक्यातील सिंधीकाळेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उर्दू माध्यम यांची पहिली ते पाचवी व सहावी ते आठवी गटाने जिल्हा स्तरीय
प्रश्नमंजुषा स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळाला. त्याबद्दल सिंधी काळेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश गिराम यांनी मुलांना शालेय साहित्य वाटप करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.


सिंधीकाळेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत साहीत्य वाटप करण्यात आले आहे. त्यामध्ये वही, पेन, कंपासपेटी आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पहायला मिळाले आहे.यावेळी सामाजिक कार्यकर्ते गणेश गिराम, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक.शालेय समिती अध्यक्ष गजानन गिराम,परसराम गिराम, सुभाष गिराम, गणेश गिराम, संजय गिराम, शौकत सय्यद, मतीन सय्यद, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

सिंधीकाळेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उर्दू माध्यम ही जिल्हा स्थारावर प्रश्नमंजुषा स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविल्याबद्दल विद्यार्थ्यांना भेटून स्वागत केले तसेच या विद्यार्थ्यांना शालेय साहीत्य वाटप करण्यात आले. मुल हि गावाची शान असतात. त्यामुळेच गावाच नाव मोठे होत असते. त्यामुळे या विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करून पूढिल वाटचालिस शुबेच्छा दिल्या. –गणेश गिराम सामाजिक कार्यकर्ते सिंधीकाळेगाव.

RELATED ARTICLES

Most Popular