HomeNewsस्वसंरक्षण शिबीर काळाची गरज - वर्षा पित्ती

स्वसंरक्षण शिबीर काळाची गरज – वर्षा पित्ती

-पोलीस दल सातत्याने आपल्या सेवेसाठी तत्पर- सोनवने

प्रतिनिधी | जालना

जालना शहरातील शांतीनिकेतन विद्या मंदिर या शाळेत जालना जिल्हा पोलीस दलाच्या वतीने मुलींना दोन दिवशीय शिबीर आयोजित करुन मुलांना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले. यावेळी सायबर क्राईम ब्रॅचचे प्रमुख संजय सोनवने यांनी विद्यार्थिंनीना सविस्तर मार्गदर्शनकेले.सदरील प्रशिक्षण जालना येथील कराटेपटू दत्ता पवार, ज्योती पवार, विशाल चौंडी यांनी दिले. यावेळी प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थिंनीना अनेक प्रकारे प्रात्यक्षिक सादर करुन प्रत्यक्षात मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणाच्या समारोपप्रसंगी शहरातील रॉटरी क्लबच्या वर्षा पित्ती यांनीही आवर्जुन उपस्थित राहून विद्यार्थिनीना मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष भास्करराव अंबेकर, संचालक अश्विन अंबेकर यांच्यासह माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका प्रेमला पंडीत, प्राथमिकचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर गाढवे यांची उपस्थिती होती.

🌈यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना संजय सोनवने म्हणाले की, पोलीस दलसातत्याने आपल्या सेवेसाठी तत्पर आहे. आपण आपल्यावर होणार्‍या अन्याय व अत्याचाराची माहिती तात्काळ पोलीसांना कळवावी. तक्रारदार महिला अथवा मुलीचे नाव गोपनीय ठेवण्यात येत असल्याने कोणतीही काळजी अथवा भितीबाळगण्याची गरज नाही.

🌈यावेळी मार्गदर्शन करतांना वर्षा पित्ती म्हणाल्या की, काळ बदलत आहे. त्याप्रमाणे महिलांनीही स्वसंरक्षण करता यावे या करिता अशा प्रकारेप्रशिक्षण घेवून आपला प्राण वाचवता येईल. मुलींनी कोणत्याही प्रसंगी घाबरुन जाऊ नये तर वेगवेगळ्या प्रशिक्षणात सांगितल्या प्रमाणे विविधमार्गाचा अवंलब करुन प्रतिकार करावा, पोलीस दल व समाजसेवी संघटना सदैवआपल्या पाठीशी ठामपणे उभी आहेत.

🌈यावेळी सर्व प्रशिक्षणार्थी विद्यार्थिंनीना संस्थेचे अध्यक्ष भास्करराव अंबेकर यांच्या हस्तेप्रमाणपत्र वितरीत करुन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी यावेळी शिक्षिका किर्ती खैरे, चौधरी, कांचन वाघ, अरुणा मांन्टे, सुमित्रा शर्मा,अंबादास घायाळ, प्रा. विकास राठोड, पांडूरंग वांजे, शिवहरी मांन्टेयांयासह मोठ्या संख्येने विद्यार्थिंनी, शिक्षकांची उपस्थिती होती.

स्त्री सरस्वतीबरोबरच दुर्गेचेही रुप धारण करु शकते-अश्विन अंबेकर

🌈यावेळी मार्गदर्शन करतांना संस्थेचे संचालक अश्विन अंबेकर म्हणाले की,स्त्री ही आजच्या काळात पुरुषांच्या बरोबर सर्वच क्षेत्रात काम करीत आहे. स्त्री सरस्वतीबरोबरच दुर्गेचेही रुप धारण करु शकते, याची जाणिव सर्वांनी ठेवणे आवश्यक आहे. अशा प्रशिक्षणाच्या माध्यमातून समाजात महिला, मुली अत्यंत आत्मविश्वसाने वावरु लागतील यात कुठलीही शंका वाटत नाही.

RELATED ARTICLES

Most Popular