प्रतिनिधी |जालना

जालना तालुक्यातील सावंगी तलाव तांडा येथे बंजारा लमाणा तांडा समृद्धी योजनेअंतर्गत अंडरग्राउंड नालीचे काम आज पुर्ण झाले आहे.आज दिनांक 29/12/2025 रोजी नेर काकडा तांडा येथील सहा जणांनी पाच दिवसांत हे काम पुर्ण केले आहे.तसेच मागील अनेक वर्षापासून सावंगी तलाव तांड्यातील नागरिकाची कामाची मागणी होती.पावसाळ्यामध्ये तांड्यात अनेक ठिकाणी पाणी साचत असल्यामुळे रोगराई पसरत होती.त्यामुळे तांड्यातील नागरिक अनेक रोगांना त्रस्त होते.या गोष्टीचा विचार करून तुकाराम राठोड यांनी भारतीय जनता पार्टीचे ओबीसी नेते अशोक अण्णा पांगरकर यांची भेट घेतली व तांड्यातील समस्येबद्दल व विकास कामाबद्दल चर्चा केली.यावेळी अशोक अण्णा पांगारकर यांनी सावंगी तलाव तांडा येथे १० लक्ष रुपयाचे विकास कामासाठी महायुती सरकारकडून ग्रामीण भागासाठी निधी मंजूर करून आणला आहे.

तसेच त्यामुळे आज अशाप्रकारे विकास कामे होताना पाहाव्यास मिळत आहे.निधी मंजूर केल्याबद्दल अशोक अण्णा पांगारकर यांचे तांड्यातील नागरिकांनी मनापासून आभार मानले आहे.






