शाम गिराम |सिंधी काळेगाव
शहरासह ग्रामीण भागातही कडाक्याच्या थंडीमुळे गारवा निर्माण होवून वातावरण बदलाने विविध रोगांनी डोके वर काढले आहे. त्यामुळे उबदार कपडे परिधान करून आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.

गत आठवडाभरापासून शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातही घरोघरी सर्दी, खोकला, अंगदुखी, तापाचे रुग्ण आढळत आहेत. ग्रामीण रुग्णालयांसह खासगी दवाखाने साथरोगाच्या रुग्णांनी फुल्ल दिसत आहेत. सध्या हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीपडत असुन दरम्यान वातावरणात गारवा निर्माण होत आहे. या बदलत्या वातावरणाचा मात्र नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. ताप, खोकला, सर्दी, अंगदुखीसह साथ रोगाने डोके वर काढले आहे.त्यामुळे रुग्णाची संख्या वाढली आहे.

” मनुष्य तेव्हाच सुखी राहू शकतो जेव्हा त्याचे शरीर निरोगी आणि तंदुरुस्त असेल. स्वस्थ शरीरासाठी नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. एक निरोगी शरीर प्राप्त करण्यासाठी व्यायामाचे महत्त्व भरपूर आहे, नियमित व्यायाम केल्याने शारीरिक सुखासोबत मनुष्याला मानसिक संतुष्टी ची प्राप्ती होते.”
डॉ.बळीराम महाराज यादव;आयुर्वेदचार्य रामनगर

“सध्या वातावरणात बदल होत असल्याने आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. सर्दी, खोकला, ताप असलेल्या रुग्णांची संख्या ही सर्वात जास्त दिसत आहे.नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, उबदार कपडे परिधान करावेत, विशेषतः स्वच्छता ठेवत आरोग्यविषयक काळजी घेत डॉक्टरांचा सल्ला घेण्याची गरज आहे.”
डॉ.अमोल गिराम. अंजली क्लिनिक सिंधीकाळेगाव

“बदलत्या वातावरणासोबतच दूषित पाणी आणि डासांच्या प्रादुर्भावामुळे मुलांना आजार होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी घरात किंवा परिसरात पाणी साचून राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. पाणी उकळूनच प्यावे, उघड्यावरील खाद्य पदार्थ खाणे टाळणे आवश्यक आहे.”
डॉ.भरत गिराम;साई क्लिनिक सिंधीकाळेगाव.

।







