
प्रतिनिधी |जालना
शहरातील चंदनझिरा प्रभागातील सुंदरनगर, नागेवाडी अशा या विविध भागात शिवसेना संपर्क नेते भास्करराव अंबेकर व युवा सेना सचिव अभिमन्यू खोतकर यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेतल्या.यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे उमेदवार गणेशराव राऊत, संगीताताई एखंडे, साखरा धोत्रे, राधाकिसन दाभाडे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना संपर्कप्रमुख भास्करराव अंबेकर म्हणाले की, अर्जुनराव खोतकर आमदार असताना व मी नगराध्यक्ष असतांना जायकवाडी ते जालना पाणीपुरवठा योजना करण्यात आली. त्यामुळे शहराची तहान भागवता आली. पण आज 65 एमएलडीची योजना कार्यरत असूनही मध्यंतरीच्या काळात केवळ नियोजना अभावी पाणी मिळू शकले नाही. मा.एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सर्व रस्ते सिमेंट काँक्रीटचे केले. तसेच शंभर कोटी रुपये सौर ऊर्जेसाठी आणले. त्यामुळे मोठी वीजेच्या खर्चावरील बचत होणार आहे. तसेच शहरातील हजारो झोपडपट्टी धारकांना पी.आर.कार्ड मिळावे या करिता आवाज उठवून ते नागरिकांना मिळण्यासाठी मदत केली.
तर भास्करराव अंबेकर नगराध्यक्ष असताना त्यांनी जालना शहरात छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचा कायापालट केला. जालना शहरातील मा.फुलंब्रीकर नाट्यगृह बंद अवस्थेत पडून होते. त्याचे नूतनीकरण करून कायापालट केला. त्याचबरोबर शहरात नवीन 12 पर्यायी रस्ते तयार करून शहरातील वारंवार होणारी वाहतुकीची कोंडीचा प्रश्न सोडवला. टाऊन हॉल येथे व्यापारी संकुल व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह उभारले, नगर परिषदेची प्रशासकीय इमारतीची उभारणी त्यांच्या कार्यकाळात केली,

त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांची पुतळे उभारले अशी अनेक विकास कामे आ.अर्जुनराव खोतकर यांच्या नेतृत्वात भास्करराव अंबेकर यांनी केली. घाणेवाडी जलाशय पूर्णतः कोरडा झाल्यानंतर केवळ शहगड योजनेवरून उत्कृष्ट नियोजन करून दर तीन दिवसाला शहराला पाणीपुरवठा करण्यात आला. जालना शहरातील स्वच्छतेसाठी घनकचरा प्रकल्प उभारण्यात आला. शहरात घंटागाड्यांची सुरुवातही अंबेकर यांनी त्यांच्या कार्यकाळात केली.
जालना शहरात झालेल्या विकासकामांचे श्रेय घेण्याचा त्यांनी कधीच प्रयत्न केला नाही.मागील दहा वर्षांपासून नगरपरिषद ताब्यात नव्हती त्यामुळे जालना शहराच्या विकास कामांचा पार बटयाबोळ झाला आहे. ही महानगरपालिका काम करणाऱ्या विकासाच दृष्टी असणाऱ्या अर्जुनराव खोतकर व भास्करराव अंबेकर यांच्या ताब्यात द्यावी अशी विनंती यावेळी संपर्कप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी मतदारांना केली.या प्रभागात झालेल्या सर्वच बैठकांना शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व मोठ्या संख्येने मतदार, नागरिकांची उपस्थिती होती.





