HomeNewsजालना तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी रोजगार हमी योजनेतील कामांना मंजुरी देण्याची मागणी.

जालना तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी रोजगार हमी योजनेतील कामांना मंजुरी देण्याची मागणी.

मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत रोजगार हमी योजना मंत्री भरतशेठ गोगावले यांच्याकडे करण्यात आली.

प्रतिनिधी |जालना

जालना तालुक्यात मागील वर्षी तसेच यंदाही झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिक, जनावरे व शेतीजमिनीचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी पूर्णपणे आर्थिक अडचणीत सापडला आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन तालुक्यातील शेतकऱ्यांना म.रो.हमी योजने अंतर्गत अधिकाधिक वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्ये कामे मंजूर करून तात्काळ सुरू करण्यात यावीत, अशी मागणी राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री श्री भरतशेठ गोगावले यांच्याकडे करण्यात आली.

यामध्ये विहीर खोदकाम, वृक्ष लागवड, शेततळे निर्मिती, जनावरांसाठी गोठा बांधकाम अशा कामांचा समावेश असून या कामांना मोठ्या प्रमाणात मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तसेच तालुक्यातील अनेक गावांमध्ये पांदण रस्ते व खडीकरणाची कामे बंद असून संबंधित विभाग कामे करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा उल्लेखही निवेदनात करण्यात आला.गावोगावी शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती लक्षात घेता, ही कामे तातडीने सुरू करावीत व संबंधित यंत्रणेला याबाबत आदेश देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले .यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रामेश्वर वाडेकर, सुशील पिसुरे, माजी सभापती पांडुरंग डोंगरे, सरपंच अशोक ढेंगळे, अंतरवाला सरपंच गणेश शिंदे, बाजीउम्रद सरपंच संजय राठोड, साळेगाव घारे सरपंच संदीप घारे,आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular