प्रतिनिधी|जालना
अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत देशातील व महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमीचे प्रेरणास्थान , जागतीक दर्जाचे योध्दा , छत्रपती शिवाजी महाराज यांच जागतीक दर्जाचे शिवस्मारक अरबी समुद्रात उभारण्याच स्वप्न देशांतील व महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमीना दाखवल पण, तब्बल आठ वर्षे पूर्ण झाल पण काम मात्र शुन्य आहे .

देशाचे महामहीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 डिसेंबर 2016 ला मोठ्या थाटामाटात शिवस्मारकाच्या जागेच जलपुजन केले . तेव्हा महाराष्ट्रातील शिवप्रेमीना मोठी आशा त्यांनी दाखवली. या कामासाठी तीन हजार कोटी पेक्षा जास्त रक्कम खर्च करण्याची तयारी दाखवली. पण गेली आठ वर्षे होऊन गेली काम पूर्ण झाले नाही . महायुती सरकार स्थापन झाल्या पासून कोणताही सत्ताधारी व विरोधी आमदार या कामाबद्दल जाहीर बोलत नाही . सरकार स्थापन झाल्यापासून अनेक अधिवेशन झाली पण या प्रश्नावर चर्चा झाली नाही. सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेब अनेक वेळा महाराष्ट्रात येतात सभा घेतात पण या कामाचा उल्लेख करताना दिसत नाही. महाराष्ट्राचा स्वाभिमान व शिवप्रेमीचा श्वास आसलेल्या शिवस्मारकाच काम तातडीने सरकारने हाती घ्यावे . अशी मागणी शिवशंभू व्याख्याते कृष्णा गाडेकर यांनी केली.






