
प्रतिनिधी|जालना
‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे दि.२४ व २५ जानेवारी २०२६ रोजी दोन दिवस भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.या कार्यक्रमास देशासह आंतरराष्ट्रीय स्तरावरून मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित राहणार असून,या कार्यक्रमास जालना जिल्ह्यातील भाविकांना उपस्थित राहता यावे यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात आली असून,विविध माध्यमातून या कार्यक्रमासाठी कशाप्रकारे शासन स्तरावर नियोजन करता येतील याचा आढावा धर्म नेता तथा राज्य समन्वयक किसन राठोड यांनी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या उपस्थितीत आढावा घेतला.तसेच जालना येथील नागरिकांना मार्गदर्शन केले.यावेळी बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल,माजी आमदार अरविंद चव्हाण,विलास राठोड,अविनाश चव्हाण,उद्धव पवार,राजेश पवार,गणेश राठोड,संजय चव्हाण,अर्जुन राठोड,जिजाबाई जाधव,अंजेभाऊ चव्हाण,उमेश जाधव,श्रीकांत राठोड,तुकाराम राठोड,संदीप राठोड,अनिल राठोड,श्याम राठोड,उषा राठोड,सचिन राठोड सह अनेक मान्यवर व पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल म्हणाल्या की,नांदेड येथे होणाऱ्या शहदी समागम वर्षानिमित्त राज्य तसेच देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरून श्री गुरुतेग बहादुर साहीब जी यांना मानणारे लाखो भाविक नांदेड मध्ये येणार आहेत.तसेच जालना जिल्ह्यात देखील श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांना मानणारे शीख, सिकलीगर, बंजारा, लमाना, सिंधी, मोहयाल ,वाल्मिकी, भगत नामदेव,उदासीन असे नऊ समाज संप्रदायातील भाषिक मोठ्या प्रमाणात आहेत.त्या अनुषंगाने या नागरिकांना या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहता यावे.यासाठी जालना जिल्ह्यातील सर्व तालुके आणि ग्रामीण भागात विविध डिजिटल रथाद्वारे व इतर काही माध्यमातून व्यापक प्रमाणात जनजागृती होत आहे.ही उल्लेखनीय बाब आहे.शिक्षण विभागाने युवकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यासाठी शाळा,महाविद्यालयामध्ये निबंध स्पर्धा,वकृत्व स्पर्धा,रील स्पर्धा इत्यादी कार्यक्रम ठिकठिकाणी होताना पहावयास मिळत आहे.
तसेच सीएसआर च्या माध्यमातून किंवा दानशूर व्यक्तीकडून अन्नधान्य,पाणी बॉटल इत्यादी मदत नांदेड येथील कार्यक्रमास करता येईल का याचे पण नियोजन होत आहे.तसेच जालना जिल्ह्यातून नांदेड येथे येणारे भाविकांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी वैद्यकीय कॅम्प उभारण्यासाठी चे नियोजन केले जाणार आहे.यावेळी अनेक मान्यवरांचे कार्यक्रमाच्या अनुषंगाने मार्गदर्शन झाले.तसेच शासन स्तरावर बसेस तसेच रेल्वे ची व्यवस्था सुद्धा करण्यात येणार असल्याचे माहीत मिळत आहे.या बैठकीस मुख्याधिकारी,गट विकास अधिकारी,तहसीलदार तसेच प्रशासनातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






