
प्रतिनिधी|जालना
जालना तालूक्यातील गट ग्रामपंचायत कार्यालय सावंगी तलाव येथे राजमाता जिजाऊ साहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तथा सरपंच कमलाकर कळकुंबे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून,त्यांच्या कार्यास अभिवादन करण्यात आले.यावेळी कमलाकर कळकुंबे(सरपंच),परमेश्वर रंधवे (ग्रा.पं.सदस्य),अरुण गायकवाड(तंटामुक्ती अध्यक्ष),निखिल भंडारे(पोलीस पाटील),अजिंक्य कळकुंबे(युवा उद्योजक),किशोर झोरे(शिवसेना नेते),संतोष राऊत,सखाराम मुळे,तुकाराम राठोड(पत्रकार),बाळु हारकळ(प्रहार तालुका अध्यक्ष),श्रीधर खराडे,सुनील आहेरकर(कॅम्पुटर ऑपरेटर),विठ्ठल जाधव,नारायण आहेरकर(ग्रा.पं.कर्मचारी) यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.






