प्रतिनिधी|जालना

जालना तालुक्यातील रामनगर येथील अजितदादा पवार महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना अभिवादन करणाऱ्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत असताना प्राचार्य डॉक्टर नालेगावकर सर म्हणाले, की समता मुलक विकसित भारतासाठी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचे विचार आजच्या युवा पिढीने आचरणात आणणे खूप गरजेचे आहे. तसेच व्हाट्सअप किंवा इतर प्रसार माध्यमांवरील तोकडी माहिती अभ्यासण्यापेक्षा मूळ ग्रंथांचे वाचन करून ज्ञानसंपन्न होणे खूप गरजेचे आहे. ही वाचन संस्कृती जपून विद्यार्थ्यांनी स्वयंपूर्ण होणे ही आजच्या काळाची खरी गरज आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी मार्गदर्शक प्रा. रामेश्वर गोडसे सर म्हणाले की मानवात देव शोधणारे गाडगेबाबांचे विचार हे आज जपणं खूप गरजेचं आहे.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रमाधिकारी डॉ. कमलाकर रगडे यांनी केले. तर आभार डॉ. दिलीप देवडे सर यांनी व्यक्त केले. यावेळी संजय चव्हाण, धनंजय घुले,सचिन भुतेकर यांच्यासह विद्यार्थी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते.






