
प्रतिनिधी |जालना
बंजारा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न हिवाळी अधिवेशनात मांडल्याबद्दल आ. अर्जुनराव खोतकर यांचा बंजारा समाज बांधवांच्या वतीने सोमवारी (दि. १५) सायंकाळी ०५.०० वाजता भाग्यनगर येथील निवासस्थानी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.बंजारा समाजाचे उपोषणकर्ते विजय चव्हाण यांचे उपोषण सोडवण्यासाठी आ. खोतकर यांनी पुढाकार घेऊन महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. समाजाच्या मागण्या सोडवण्यासाठी शासनाकडून एक समिती गठीत करण्यात आली, ज्यामुळे काही प्रश्न मार्गी लागले. तथापि, हैदराबाद गॅझेटप्रमाणे बंजारा समाजाला आदिवासीच्या सवलती मिळाव्यात यासाठी हिवाळी अधिवेशनात आ. अर्जुनराव खोतकर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित करत अध्यक्षांचे लक्ष केंद्रित केले.आणि बंजारा समाजाचे प्रश्न तत्काळ सोडवावे, अशी विनंती केली. याबद्दल आमदार अर्जुनराव खोतकर यांचा सत्कार करण्यात आला आहे.
सत्कार करतांना सावंगी तलान येथील सरपंच कमलाकर कळकूंबे.माजी सभापती पांडुरंग डोंगरे.शिवसेना मौजपुरी सर्कल उपविभाग प्रमुख लक्ष्मण चव्हाण.संजय राठोड.नरसिंह गोरे.अनिल राठोड. सुरज चव्हाण. सुभाष राठोड यांच्यासह आदी उपस्थित होते.







