HomeNewsथंडीचा कडाका वाढताच सुकामेव्याचा बाजार गरम.

थंडीचा कडाका वाढताच सुकामेव्याचा बाजार गरम.

थंडीची चाहूल लागताच रामनगर आठवडी बाजारात सुका मेव्याची खरदी सुरू

शाम गिराम |सिंधीकाळेगाव

जालना तालुक्यातील रामनगर येथील आठवडी बाजारात सुका मेव्याची खरेदी करताना दिसत आहे. (छायाचित्र शाम गिराम – सिंधीकाळेगाव)

गुलाबी थंडीचे दिवस सुरू झाले की,शरीर अधिकाधिक निरोगी कसे राहील याकडे प्रत्येक व्यक्तीचा कल असतो.सध्या गुलाबी थंडीचे प्रमाण हळूहळू वाढू लागले असून शरीर बळकटीसाठी व्यायामाबरोबरच पहाटे व सायंकाळच्या सुमारास धावणे व चालण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे.सुकामेवा खरेदीकडे सध्या वाढता कल दिसून येत आहे.खोबर,खारीक,काजू, बदाम, पिस्ता,मनुके,सुके अंजीर यांसारख्या सुक्या मेव्याच्या सेवनाने विविध आजारांपासून रक्षण होते.

हिवाळ्यात उत्तम व सुदृढ आरोग्य प्राप्तीसाठी सुकामेव्याला अधिक पसंती दिली जाते जालना तालुक्यातील रामनगर येथील आठवडी बाजारात ग्राहंकानी काजू,बदाम,खोबर,खारीक आदी सुकामेव्याची बाजारात मागणी वाढली आहे थंडीचा कडाका वाढल्याने आहारवर भर दिला जातो खारीक खोबर्याचे लाडू बनवल्या जाते हे बनवण्यासाठी बाजारात खरेदीसाठी स्त्रियांची मोठ्या प्रमाणात रेलचेल सुरू झाली आहे

अशी घ्या आरोग्याची काळजी.

थंडीच्या दिवसात तब्येत चांगली राहण्यासाठी योग्य आहार, पुरेशी झोप, हलका व्यायाम आणि गरम कपड्यांचा वापर ही चार मूलभूत गोष्टी पाळणे आवश्यक आहे. दुधात हळद, गूळ, तिळाचे लाडू, खजूर, सुका मेवा व गरम सूप यामुळे शरीराला उष्णता मिळते व रोगप्रतिकारक शक्ती वाढते. सकाळी गार वारा जास्त असेल तरीही हलके चालणे, सूर्यप्रकाशात बसणे व कोमट पाण्याने आंघोळ करणे फायदेशीर ठरते. डोकं, कान व पाय झाकून ठेवले तर थंडीचा त्रास कमी होतो. थंड पाणी, जंक फूड व जास्त थंड पेय टाळल्यास सर्दी-खोकल्यापासून संरक्षण मिळते. थंडीच्या दिवसात ज्येष्ठ नागरिक, लहान मुले व दमा किंवा BPचे रुग्ण यांनी विशेष दक्षता घ्यावी. थोडक्यात, योग्य आहार, योग्य कपडे, योग्य सवयी व योग्य काळजी या गोष्टी थंडीमध्ये तब्येत छान राहण्याचे गुपित आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular