शाम गिराम|सिंधी काळेगाव
जालना तालुक्यातील रामनगर येथील अजितदादा पवार महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दत्तात्रय नालेगावकर सर हे होते.यावेळी ते बोलताना म्हणाले की डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ दलितांसाठीच नव्हे तर समग्र भारत वाशियांसाठी,देशवासीयांसाठी देश उभारण्याचं महत्त्वाचं कार्य केलेलं आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायावर आधारित समाज रचना ही डॉ.बाबासाहेब आंबेडकरची खूप मोठी देन या देशाला लाभलेली आहे.यावेळी प्रा. रामेश्वर गोडसे सर यांनी देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख डॉ. कमलाकर रगडे डॉ.दिलीप देवडे प्रा.सुदर्शन मोरे,संजय चव्हाण,धनंजय घुले, श्री सचिन भुतेकर यांच्यासह विद्यार्थी स्वयंसेवक मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कमलाकर रगडे यांनी केले,तर आभार डॉ. दिलीप देवडे सर यांनी व्यक्त केले.







