प्रतिनिधी |सिंधी काळेगाव
जालना तालुक्यातील बाजीउम्रद व जळगाव परिसरात बिबट्या दिसल्याने शेतकरी व नागरिक भयभायीत झाले आहे. गत पंधरा दिवसापूर्वी बिबट्या दिसला त्या घटनास्थळवर जाऊन जालना वन विभागाच्या अधिकऱ्यांनी पाहणी केली व त्या पायाच्या ठश्याच्या आधारे बिबट्या ला पकडन्यासाठी पिंजरे ही लावले असले तरी बिबट्या वनविभागाच्या हाती लागलेला नाही. ऐन कामाच्या दिवसात बिबट्याच्या दहशतीने शेतात कापूस वेचणीला मंजूर मिळत नाही. कपाशी, गहू, हरभरा ला पाणी देणे चालू आहे. व महावितरण द्वारे रात्रीचा विद्युत पुरवठा करण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली होती. तेव्हा ब्राम्हणखेडा येथील युवा सेना जालना तालुका प्रमुख नागेश डवले यांनी परिसरातील शेतकऱ्यांना घेऊन महवितरण कार्यालयात जाऊन अधिकाकऱ्यांना जळगाव व बाजीउम्रद शिवारातील थ्री फेज चा विद्युत पुरवठा देण्याची मागणी केली व जालना विधानसभा मतदार संघांचे आमदार अर्जुनराव खोतकर यांनी अभियंता यांना परिसरातील गावांना भरणीयम बंद करून शेतकऱ्यांना दिवसा विद्युत पुरवठा करावा अशा सूचना भ्रमणध्वनीद्वारे दिल्या. जळगाव व बाजीउम्रद शिवारास शेतीला पाणी देण्यासाठी दिवसा विद्युत पुरवठा देण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. त्याच प्रमाणे रामनगर, सावरगाव, ब्राह्मणखेडा, सोमनाथ व परिसरातील शेतकऱ्यांना दिवसा विद्युत पुरवठा करावा अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. बाजीउम्रद येथील वासरावर हल्ला.
जालना तालुक्यातील बाजीउम्रद येथील शेतकरी कृष्णा पडूळ यांच्या वासरावर ३० नोव्हेंबर रोजी बिबट्याने हल्ला केला यामुळे परिसरातील शेतकरी भयभयीत झाले आहेत.

नागेश डवले कार्यालयात जाऊन अधिकाकऱ्यांना जळगाव व बाजीउम्रद शिवारातील थ्री फेज चा विद्युत पुरवठा देण्याची मागणी केली






