Homeराजकीयलाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत पात्र लाडकी बहीण यांनी ई...

लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत पात्र लाडकी बहीण यांनी ई केवायसी करून घ्यावी

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे सदस्य संतोष ढेंगळे यांचे आवाहन.

प्रतिनिधी |सिंधी काळेगाव

राज्यातील लाडक्या बहिनांना महायूती सरकारने सूरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ राज्यभरात सुरू असून पात्र लाभार्थीना दिलासा देत राज्य सरकारने योजनेतील ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. यापूर्वी १८ नोव्हेंबर २०२५ ही अंतिम तारीख जाहीर करण्यात आली होती. मात्र विविध अडचणींमुळे अनेक लाभार्थीना वेळेत ई-केवायसी करता आली नाही. त्या पार्श्वभूमीवर अंतिम मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. अद्याप ई-केवायसी न केलेल्या सर्व पात्र भगिनींनी विस्तारित मुदतीचा लाभ घेऊन ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी असे आवाहन जालना येथील मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे सदस्य संतोष ढेंगळे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular