
प्रतिनिधी | जालना
भिकन जाधव यांची श्री संत सेवालाल महाराज बंजारा लमाण तांडा समृद्धी योजनेच्या राज्य समन्वयक पदी नियुक्ती झाली आहे.ही नियुक्ती मुख्यमंत्री सचिवालयातर्फे करण्यात आली आहे.भिकन जाधव यांनी पोलीस प्रशासनामध्ये मागील अनेक वर्षापासून राष्ट्र सेवा तसेच राष्ट्रीय बंजारा परिषदेतर्फे समाजकार्य हाती घेतले आहे.त्या कामाची पोच पावती म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही शिफारस केली आहे.या नियुक्ती बद्दल राष्ट्रीय बंजारा परिषदेचे सर्वेसर्वा किसन राठोड,विलास राठोड,अंजेभाऊ चव्हाण,श्रीकांत राठोड,तुकाराम राठोड यांनी महाराष्ट्र सरकारचे तसेच भिकन जाधव यांचे अभिनंदन केले आहे.याप्रसंगी रामेश्वर नाईक यांनी सांगितले की,भिकन जाधव यांनी पोलीस प्रशास्रामध्ये केलेले अप्रतिम कार्य आणि अनुभवामुळे ही नियुक्ती झाली आहे,हे आपले व समाजाचे गौरव आहे.आपले काम समाजसेवा आणि विकासाच्या दिशेने निश्चितच मार्गदर्शक ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली.यावेळी अनेक मान्यवरांकडून त्यांना शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.भिकन जाधव यांना पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा.






