Homeशैक्षणिकशेतकऱ्याचा मुलगा झाला डॉक्टर. अमोल जाधव यांना BAMS,MD (AM) डिग्री प्रदान.

शेतकऱ्याचा मुलगा झाला डॉक्टर. अमोल जाधव यांना BAMS,MD (AM) डिग्री प्रदान.

छोट्याशा तांड्यातील अमोल राम जाधव यांच्या मेहनतीला दिव्य मराठवाडा न्युज चा सलाम.

प्रतिनिधी |जालना

सिंदखेडराजा तालुक्यातील वसंतनगर तांडा या छोट्याशा तांड्यातील अमोल राम जाधव यांनी BAMS,MD (AM) मध्ये डिग्री संपादन केली आहे.त्यांनी डॉ.दीपक पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर कोल्हापूर येथे शिक्षण पूर्ण केले आहे.अमोल जाधव हा स्वराज्य बॅच 2019 चा विद्यार्थी होता.हा डिग्री प्रदानाचा कार्यक्रम सयाजी हॉटेल कोल्हापूर येथे पार पडला आहे.यावेळी अमोल चे आई-वडील याप्रसंगी उपस्थित होते.अमोल यांना डिग्री मिळाल्याबद्दल आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते.अमोल यांनी कठोर मेहनत व परिश्रम घेऊन हे यश संपादन केले आहे.

तसेच यावेळी अमोल जाधव यांनी सांगितले की,माझे आई वडीलांनी शेती व मजुरी करून मला शिकवले त्यांचे ऋण मी कदापी विसरणार नाही.या यशाबद्दल अमोल जाधव यांनी आई,वडिल व डॉक्टर दीपक पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज येथील डॉक्टर व मित्रांचे मोलाचे सहकार्य लाभल्यामुळे हे यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले.भविष्यात या यशाचे फलित म्हणून मी गोरगरीब,कष्टकरी,शेतमजूर,सर्वसामान्य नागरिकांची सेवा करण्यास प्रथम प्राधान्य देईल असे अमोल जाधव यांनी याप्रसंगी आपली भावना व्यक्त केली.तसेच अमोल जाधव हा एडवोकेट श्याम विठ्ठल राठोड व कृष्णा विठ्ठल राठोड सावंगी तलाव यांचा भासा आहे.तसेच अमोल जाधव यांना पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

RELATED ARTICLES

Most Popular