HomeNewsशालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी परसराम गायके तर उपाध्यक्ष पदी दत्ता रूद्रे...

शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी परसराम गायके तर उपाध्यक्ष पदी दत्ता रूद्रे यांची निवड.

प्रतिनिधी|सिंधी काळेगाव

जालना तालुक्यातील पाथ्रुड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सोमवार रोजी शालेय व्यवस्थापन समिती चे पुनर्गठण करण्यात आले.याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांमधून व्यवस्थापन समितीचे निवड करण्यात आली.परसराम शहादेव गायके यांची अध्यक्ष पदी व उपाध्यक्षपदी दत्ता नारायण रुद्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.निवड झालेल्या सर्व सदस्यांना शाळा व्यवस्थापन समितीची कार्य,जबाबदारी व व्यवस्थापण समितीचे योगदान तसेच शालेय विध्यार्थी चा सर्वांगीण विकास,भौतिक सुविधा सशक्त करण्यासाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या.

शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्य पदी माणिक लहाने, भागोजी मंत्री, सुरेखा कपे सगुणा राठोड, जयश्री भगुरे, मंगल धाईस्कर, प्रदीप कुऱ्हे , यांची पालक सदस्यांमधून निवड करण्यात आली. शिक्षणतज्ञ म्हणून संजय राठोड यांची तर शिक्षक प्रतिनिधी म्हणून बंडू गिरम यांची निवड करण्यात आली. उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार शाळेचे मुख्याध्यापक गोविंद मदिलवाड यांनी मानले.

RELATED ARTICLES

Most Popular