Homeराजकीयसिंदखेड राज्यात तरुण नेतृत्वाचा उदय : अवघ्या २१व्या वर्षी सौरभ तायडे नगराध्यक्ष.

सिंदखेड राज्यात तरुण नेतृत्वाचा उदय : अवघ्या २१व्या वर्षी सौरभ तायडे नगराध्यक्ष.

सौरभ तायडे हे जालना तालुक्यातील देवमुर्तीचे जावाई.

प्रतिनिधी | सिंदखेडराजा

सिंदखेडराजा नगरपरिषदेच्या अतीतटीच्या आणि चुरशीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे सौरभ तायडे यांनी १६९ मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला. या विजयासह अवघ्या २१व्या वर्षी नगराध्यक्षपदाची धुरा स्वीकारत त्यांनी सर्वात तरुण लोकनियुक्त नगराध्यक्ष होण्याचा मान पटकावला आहे. या निकालामुळे सिंदखेडराजाच्या राजकारणात तरुण नेतृत्वाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. युवक एकत्र आल्यास नक्कीच बदल होतो हे यातून स्पष्ट दिसून आले.
नगरपरिषदेचे नवनियुक्त व लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर जालना तालुक्यातील देवमुर्ती येथील ग्रामस्थांनी सौरभ तायडे यांची भेट घेऊन जंगी सत्कार केला.

या सत्कारप्रसंगी शिवसेनेचे भावी जिल्हा परिषद सदस्य कृष्णा जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य रामचंद्र फुलझाडे, गब्बर सय्यद, दिगंबर सातपुते, दिगंबर चौरे, राजू फुलझाडे, विजय फुलझाडे, शंकर चौरे यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.तरुणाईला संधी दिल्यास विकासाला नवी दिशा मिळते, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

सौरभ तायडे यांच्या या ऐतिहासिक विजयाने सिंदखेडराजा शहराच्या राजकारणात नवचैतन्य निर्माण झाले असून, युवकांना नेतृत्वाची संधी देणाऱ्या या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. आगामी काळात शहर विकास, पारदर्शक कारभार आणि जनतेच्या अपेक्षांची पूर्तता यासाठी तरुण नगराध्यक्षांकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular