Homeशैक्षणिकवडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ मुलाकडून नेर शाळेत साहात्य वाटप.

वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ मुलाकडून नेर शाळेत साहात्य वाटप.

प्रतिनिधी |सिंधी काळेगाव

जालना तालुक्यातील नेर येथील रहिवासी दादाराव कुरेवाड यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक आदर्श सामाजिक उपक्रम राबवून समाजापुढे प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे. कै. काशिनाथजी पाराजी कुरेवाड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जि. प. के. प्राथमिक शाळा, नेर येथील एकूण २०१ विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक स्टील बॉटल, पेपर पॅड व पेनचे वाटप करण्यात आले.
हा उपक्रम दादाराव कुरेवाड यांचा पहिलाच नसून, यापूर्वी २०१८ साली त्यांनी आपल्या आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्वाध्याय पुस्तिकांचे वाटप केले होते. तसेच त्यांच्या वतीने वस्तीगृहातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधून दहावी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यास ७ हजार रुपये, द्वितीय क्रमांकास ५ हजार रुपये व तृतीय क्रमांकास ३ हजार रुपये असे रोख बक्षीस दरवर्षी देण्यात येते.
याशिवाय स्थानिक वारकरी संस्थानमधील सर्व ३९ वारकरी विद्यार्थ्यांना संपूर्ण गणवेशाचे वाटपही त्यांच्या पुढाकारातून करण्यात आले आहे. समाजोपयोगी व शिक्षणप्रेमी अशा या उपक्रमांमुळे त्यांचे कार्य विशेष कौतुकास्पद ठरत आहे.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे माजी मुख्याध्यापक विजय पितळे, कार्यरत मुख्याध्यापक ज्ञानेश्वर मोठे, शिक्षक बागल, मिसाळ, वाकडीकर, बेहरे, सुरूशे, गाडेकर, तसेच गावचे माजी सरपंच प्रकाश कुपटकर, भास्करराव कुळवंत, निलेश मासटवाड, विठ्ठल भुतेकर, कोळे व विष्णू मुपडे यांनी सहकार्य केले.
दादाराव कुरेवाड यांच्या या सामाजिक कार्याचे संपूर्ण गावात कौतुक होत असून, गरजूंना मदत करणे हेच खरे पुण्यकर्म असल्याचे त्यांचे मत आहे. त्यांची ही विचारधारा समाजाला नवी दिशा देणारी ठरेल, असे मत व्यक्त केले जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular