HomeNewsसावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वसा आजच्या तरुणाईने जपावा :प्राचार्य डॉ.डी. टी.नालेगावकर

सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वसा आजच्या तरुणाईने जपावा :प्राचार्य डॉ.डी. टी.नालेगावकर

प्रतिनिधी|जालना

रामनगर येथील अजितदादा पवार महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने,माता सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.डी. टी.नालेगावकर सर हे होते. त्यांच्या हस्ते माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून,अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की, सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वसा आजच्या तरुणाईने जपावा.म्हणजे त्यांची जयंती साजरे करण्यामागील उद्देश खऱ्या अर्थाने सफल होईल.

याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले डॉ. दिलीप देवडे सर म्हणाले की सावित्रीबाई फुले यांच्या कार्यामुळेच आज देशाच्या सर्वोच्च पदावर एक महिला विराजमान आहे. ही माता सावित्रीबाईंची पुण्याई आहे.तर दुसरे मार्गदर्शक प्रा. रामेश्वर गोडसे सर म्हणाले की,महाराष्ट्र ही संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे.त्यामुळे शिक्षण आणि संस्कार यांचा अद्वितीय असा संगम येथील संस्कृतीमध्ये आपल्याला दिसून येतो. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित म्हणून प्रा. सुदर्शन मोरे,प्रा.संजय चव्हाण, श्री धनंजय घुले यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रमाधिकारी डॉ. कमलाकर रगडे यांनी केले.तर आभार प्रा.सुदर्शन मोरे यांनी व्यक्त केले.

RELATED ARTICLES

Most Popular