
प्रतिनिधी|जालना
जालना तालुक्यातील सावंगी तलाव तांडा येथे बंजारा समाजाला एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळावे यासाठी सलग नऊ दिवस उपोषण केले असे विजय नायक चव्हाण यांनी सावंगी तलाव तांडा येथे भेट दिली.यावेळी सावंगी तलाव तांडा येथील नागरिकांनी त्यांचा शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी बंजारा समाजाच्या विविध समस्या,अडी-अडचणी तसेच प्रामुख्याने एसटी आरक्षण संदर्भात व अनेक विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.बंजारा समाजातील तरुणांनी व्यसनापासून दूर राहावे असे अहवाल यावेळी विजय नायक यांनी केले आहे.तसेच आपणाला मुला मुलींच्या भविष्यासाठी एसटी आरक्षण साठी लढा तीव्र स्वरूपामध्ये करावे लागेल.त्यावेळी आपण मला साथ द्यावे अशी भावना विजय नायक यांनी बोलून दाखवली आहे.आणी भविष्यात बंजारा समाजाला मुंबई व दिल्लीत मोठी भाव्य-दिव्य आंदोलन करावे लागेल असे आवाहन चव्हाण यांनी केले आहे.यावेळी तांड्यातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.






