खरपुडी प्रीमियर लीग २०२५’ या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला उत्साहात सुरुवात.

खरपुडी प्रीमियर लीग २०२५’ या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला उत्साहात सुरुवात.

जालना तालुक्यातील खरपुडी येथे ‘खरपुडी प्रीमियर लीग २०२५’ या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला उत्साहात सुरुवात झाली. एक गाव, एक आकर्षण या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा ग्रामीण भागातील प्रतिभावान खेळाडूंना व्यासपीठ देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे. स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे शिवसेनेचे कृष्णा जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध मान्यवर, कार्यकर्ते आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेचे पहिले बक्षीस ३११११ कृष्णा जाधव यांच्याकडून देण्यात येणार आहे. द्वितीय क्रमांकाचे बक्षीस १५५५५ रुपये असून ते सुमित भाऊ खंदारे यांच्या मार्फत देण्यात येणार आहे. तसेच ‘मॅन ऑफ द सिरीज’, ‘बेस्ट बॅट्समन’ आणि ‘बेस्ट बॉलर’ अशी प्रत्येकी २१०० रुपयांची आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

स्पर्धेच्या आयोजनात फायरस्ट ग्रुप, प्रार्थना ग्रुप, आदर्श ग्रुप, तसेच अनेक स्थानिक कार्यकर्त्यांनी विशेष सहकार्य केले आहे. उद्घाटनप्रसंगी बोलताना कृष्णा जाधव यांनी ग्रामीण भागातील क्रीडा संस्कृती कायम ठेवण्यासाठी अशा स्पर्धांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, ग्रामीण स्तरावर खेळाडूंना योग्य व्यासपीठ मिळाले तर ते राज्य व राष्ट्रीय पातळीवरही उत्तुंग भरारी घेऊ शकतात. खरपुडीसारख्या गावात प्रीमियर लीगचे आयोजन होणे हे गावाच्या क्रीडा जाणिवेचे प्रतीक आहे. शिस्त, नियमित सराव, संघभावना आणि क्रीडांगणातील वर्तन यांची महती पटवून देत ते म्हणाले कि, क्रिकेट हा खेळ केवळ विजय–पराभवापुरता मर्यादित नसून तरुणांमध्ये नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि मानसिक ताकद वाढवणारा खेळ आहे. त्यामुळे प्रत्येक संघाने प्रामाणिकपणे खेळ करावा, असे त्यांनी आवाहन केले.या कार्यक्रमाला बाबा कसबे, अमोल भोसले, कृष्णा गायकवाड, संदीप सोनवणे, राजु भिसे, राहूल निकाळजे, आनंद भोसले, सचिन काळे, किरण भोसले, नवनाथ शेरे, आण्णा गायकवाड, सुमित खंदारे, आशिष भोसलेसह खेळाडू, ग्रामस्थ आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.